शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशाकरिता १६७३ अर्ज

By admin | Updated: February 21, 2017 06:25 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांस

नवी मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांस आरक्षित २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस आहे. या प्रक्रियेंतर्गत शालेय प्रवेशाकरिता ठाणे जिल्ह्यातून ४७६६ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले असून, यामध्ये २२७६ असे सर्वाधिक अर्ज नवी मुंबई परिसरातील असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप सांगवे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यापैकी ६०३ अर्ज नाकारण्यात आले असून, १६७३ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील १०७ शाळांचा यामध्ये समावेश असून पहिलीकरिता २३७५ जागा तर पूर्वप्राथमिक विभागातील प्रथम प्रवेशाकरिता १३९२ जागा शिल्लक आहेत. यंदा प्रवेशाकरिता अंतराची मर्यादा नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. पाल्याच्या प्रवेशाकरिता १ लाख रुपये इतकी आर्थिक उत्पन्न मर्यादा आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत जानेवारी महिन्यात शाळांकरिता विशेष कार्यशाळा राबविण्यात आल्या होत्या. यावेळी मागील वर्षाच्या आॅफलाइन परिपत्रकांची माहिती शाळांकडून मागविण्यात आल्या होत्या. या कार्यशाळेत आॅनलाइन प्रक्रियेबाबत समस्यांचे निराकरण करण्यात आाले. पालकांना अर्ज भरताना काही अडचणी येऊ नयेत याकरिता १२ विशेष मदत केंद्रे स्थापन करण्यात येऊन त्याठिकाणी पालकांना अर्ज भरण्यासाठी नेमलेल्या मदत केंद्र अधिकाऱ्यांमार्फत सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात आली होती तसेच संपर्कासाठी मदत केंद्र अधिकाऱ्यांचे संपर्कध्वनी व ई-मेल आयडी उपलब्ध करून देण्यात आले होते. अर्ज स्वीकृत झालेल्या पालकांना त्यांच्या विभागातील प्रवेशासाठी पात्र झालेली शाळा त्यांनी अर्जात भरलेल्या मोबाइल क्र मांकावर शासनामार्फत आॅनलाइन कळविली जाणार असून १ ते ९ मार्च या कालावधीत पालकांनी त्या शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्यावयाचा आहे. या प्रक्रि येअंतर्गत ज्या शाळेत प्रवेश निश्चित झालेला आहे त्या शाळेत प्रवेश न घेतल्यास त्या मुलाला त्या वर्षातील पुढील प्रवेश फेऱ्यांच्या लॉटऱ्यांमध्ये सहभागी करून घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे. (प्रतिनिधी)एखाद्या शाळेत प्रवेश घेण्याच्या विहित मुदतीनंतर शाळांनी आपल्याकडील रिक्त पदांची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा आॅनलाइन दर्शवावयाच्या आहेत. याकरिता सरळ डाटा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर रिक्त जागांकरिता आॅनलाइन पध्दतीनेच दुसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रि या अशा प्रकारच्या पाच टप्प्यात होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संगवे यांनी दिली.