शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

योगींच्या मंत्र्याच्या पुतण्याचा रिक्षाचालकासोबत वाद, मध्यस्थी करणाऱ्या फूल विक्रेत्याला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 19:40 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री सोमेंद्र तोमर यांच्या एका नातेवाईकाने एका फुल विक्रेत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी दुपारी मेरठमधील एका अरुंद रस्त्यावर घडली.

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री सोमेंद्र तोमर यांच्या एका नातेवाईकाने एका फुल विक्रेत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी दुपारी मेरठमधील एका अरुंद रस्त्यावर घडली. येथे ट्रॅफिक जॅम झाल्याने वादावादी सुरू होऊन प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती आहे. 

याबाबत घटनास्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार  मंत्री सोमेंद्र तोमर यांचा पुतण्या आपल्या महिंद्रा स्कॉर्पियो कारमधून रस्त्यावरून जात होता. त्यावेळी त्याला एका ई-रिक्षाचालकामुळे थांबावं लागलं. त्यावरून ई-रिक्षाचालक आणि त्याच्यामध्ये वादावादी सुरू झाली. तसेच त्याने या ई-रिक्षाचालकाला शिव्या देण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या फुलविक्रेत्या जोडप्याने मध्ये पडत भांडण मिठवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाद आणखी वाढला.  

ही संपूर्ण घटना एका स्थानिक दुकानासमोर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. यामध्ये सुरुवातीला वादावादी होताना आणि नंतर मंत्रांचा भाचा आणि फुलविक्रेत्यामध्ये मारामारी होताना दिसत आहे. काही वेळाने एक महिला काठी घेऊन येताना दिसते. तसेच ती मंत्र्यांच्या पुतण्यावर मारताना दिसत आहे. त्यानंतर तिथे असलेले लोक फूल विक्रेत्या दाम्पत्याला पाठिंबा देताना दिसतात. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळतो.  

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचतात. दरम्यान, दोन्ही बाजूंमध्ये परस्पर सहमती झाली. तसेच पोलिसांकडे कुठलीही लेखी तक्रार दाखल करण्यात आली नाही, असे पोलिसांनी सांगितले. तसेच मारहाण करणारा आरोपी हा खरंच मंत्र्यांचा पुतण्या होता की नाही, याला दुजोरा देता येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश