शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा निष्काळजीपणा, नसबंदी केल्यानंतरही महिलेने दिला बाळाला जन्म! कोर्टाने दिला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:12 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेने नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली होती. मात्र, नसबंदी केल्यानंतरही या महिलेने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करताना केलेल्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रयगराजमधील मौईमाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेने नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली होती. मात्र, नसबंदी केल्यानंतरही या महिलेने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करताना केलेल्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. घडल्याप्रकारानंतर महिलेने डॉक्टरांविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तर, कोर्टानेही महिलेची बाजू घेत ही डॉक्टरांची चूक असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारने याचिकाकर्त्या महिलेला भरपाई द्यावी, असा आदेश कोर्टाने दिला आहे.

कोर्टाचा मोठा निर्णय 

स्थायी लोकअदालतीचे अध्यक्ष विकार अहमद अन्सारी आणि सदस्य डॉ. रिचा पाठक व सत्येंद्र मिश्रा यांच्या खंडपीठाने या खटल्याचा निकाल दिला आहे. न्यायालयाने असे म्हटले आहे की, सरकारने या महिलेला तिच्या मुलीच्या संगोपनासाठी २ लाख रुपये भरपाई द्यावी. याशिवाय, मुलीला १८ वर्षांची होईपर्यंत किंवा तिची पदवी पूर्ण होईपर्यंत दरमहा ५००० रुपये देखभालीसाठी द्यावेत.

नसबंदी शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून महिलेला अतिरिक्त २०,००० रुपये भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणी डॉक्टरांनी गंभीर निष्काळजीपणा केल्याचे म्हटले आहे. नसबंदी अयशस्वी झाल्यामुळे महिलेला केवळ शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला नाही, तर आता तिला एका बाळाचे संगोपनही करावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

नेमकं काय झालं?

न्यायालयाने हे एक सामाजिक-आर्थिक ओझे असल्याचे मान्य केले असून, सरकारने या महिलेला त्याची भरपाई द्यावी असे म्हटले आहे. याचिकाकर्त्या अनिता यांनी सांगितले की, त्यांना आधीच मुले आहेत आणि त्यांना आणखी मुले नको होती. त्यामुळे त्यांनी मौईमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली होती. मात्र, काही काळानंतर त्यांना शारीरिक समस्या जाणवू लागल्या.

त्यानंतर त्यांनी अल्ट्रासाऊंड तपासणी केली असता, त्या १६ आठवड्यांच्या गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यांनी यासाठी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आणि लोकअदालतीत खटला दाखल केला. त्यांनी जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पक्षकार बनवून निष्काळजीपणासाठी योग्य भरपाईची मागणी केली होती.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdocterडॉक्टरCourtन्यायालय