पत्नीची 7 लग्न झाली आहेत, पतीची पोलिसांत तक्रार

By Admin | Updated: September 20, 2016 13:25 IST2016-09-20T13:11:09+5:302016-09-20T13:25:58+5:30

पत्नीने माझी फसवणूक केली आहे, माझ्याव्यतिरीक्त तिचे इतर सात जणांसोबत लग्न झालं असून पत्नी माझं शोषण करते

The wife has 7 weddings, the husband complained to the police | पत्नीची 7 लग्न झाली आहेत, पतीची पोलिसांत तक्रार

पत्नीची 7 लग्न झाली आहेत, पतीची पोलिसांत तक्रार

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू,दि.20- पत्नीने माझी फसवणूक केली आहे, माझ्याव्यतिरीक्त तिचे इतर सात जणांसोबत लग्न झालं असून पत्नी माझं शोषण करते अशी तक्रार एका व्यक्तीने केला आहे. बंगळुरूचे  के.जी. हाली पोलीस  सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

बंगळुरूच्या केजी हाली येथील रहिवासी असलेल्या इम्रान यांनी आपल्या पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. यास्मिन बानू (वय 38) असं पत्नीचं नाव आहे. फसवणूक करणं हे माझ्या पत्नीच्या रक्तातच आहे, तिने माझ्यावर हल्ला देखील केला होता. तिचं माझ्याव्यतिरीक्त सात जणांसोबत लग्न झालं आहे अशी तक्रार इम्रानने केली आहे.  
 
तक्रारीनंतर शोएब आणि अफझल नावाच्या दोन व्यक्ती पोलिसांसमोर आल्या आणि यास्मिनसोबत लग्न झालं असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. यास्मिनने मला खूप जास्त पैशांची मागणी केली होती, मी पैसे द्यायला नकार दिला तर ती मला सोडून गेली असं अफझलने पोलिसांना सांगितलं.
 
पतीचं शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी यास्मिन विरोधात तक्रार नोंदवली असून फसवणूकीबाबत करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस चौकशी करत आहेत.

Web Title: The wife has 7 weddings, the husband complained to the police