शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 23:35 IST

या दृष्यानंतर, सोशल मीडियावर आदर, राजकीय शिष्टाचार आणि नम्रता यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर नितीश कुमार यांनी गुरुवारी (20 नोव्हेंबर 2025) दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे हा शपथविधी सोहळा महत्त्वाचा ठरला, या सोहळ्यात NDA ने आपले शक्तिप्रदर्शन केले. शपथविधीनंतर, विमानतळावर मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींचे पदस्पर्श करण्यासाठी वाकले, तो क्षण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

विमानतळावर 'आदराचे' अद्भुत दृश्य -शपथविधी समारंभानंतर एक मनोरंजक दृश्य बघायला मिळाले. पंतप्रधान मोदी जेव्हा पाटणा विमानतळावर परतले, तेव्हा नितीश कुमार स्वतः त्यांना निरोप देण्यासाठी तिथे पोहोचले. यावेळी, नितीश कुमार पंतप्रधान मोदींना पदस्पर्श करण्यासाठी वाकले, तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना तत्काळ असे करण्यापासून रोखले. या दृष्यानंतर, सोशल मीडियावर आदर, राजकीय शिष्टाचार आणि नम्रता यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या पक्षानं  शेअर केला व्हिडिओ - दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने नीतीश कुमार आणि पीएम मोदींचा हा व्हिडिओ आपल्या ऑफिशियल X हैंडलवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये राजदने लिहिले, "विमानतळावर पंतप्रधान मोदींना पदस्पर्श करून आशीर्वाद घेताना मुख्यमंत्री नितीश कुमार." खरे तर, नितीश कुमार यांनी यापूर्वीही अशा पद्धतीने पंतप्रधान मोदींप्रती आदर व्यक्त केला आहे.

नव्या सरकारमध्ये 10 नव्या चेहऱ्यांचा समावेश -नव्या सरकारच्या 26 सदस्यीय मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांसह 10 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात जातीय आणि प्रादेशिक संतुलनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Nitish Kumar Bows to Touch Modi's Feet: Patna Airport Moment

Web Summary : Nitish Kumar took oath as Bihar's CM for the tenth time. After the ceremony, he bowed to touch PM Modi's feet at Patna airport, sparking discussions on respect and humility. RJD shared the video.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी