शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक ड्रायव्हरनं मोडला ट्रॅफिक नियम, 2 लाख रुपयांचा दंड भरुन रचला 'नवा विक्रम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 21:42 IST

नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली.

ठळक मुद्देनवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. दिल्लीतील मुबारका चौकात एका ट्रक ड्रायव्हरला मोठा दंड भरावा लागला आहे. तब्बल 2 लाख 500 रुपयांची पावती या ट्रक ड्रायव्हरने फाडली आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी चार हजार वाहनचालकांचे चलन फाडले आहे. वाहतुकीचे नियम तोडण्यावरील कारवाईमुळे हेल्मेट, सीटबेल्ट आदींच्या बाबतीत दिल्लीकर सजग असलेले आढळले. मात्र, दिल्ली पोलिसांकडून घेण्यात आलेल्या काही दंडाच्या रकमा डोळ्याच्या पापण्या उंचावणाऱ्या आहेत. रेवाडी येथील एका ट्रक मालकाने चक्क 1.16 लाख रुपयांचे चलन फाडले होते. त्यानंतर, आता राजस्थानमधील एका ट्रक ड्रायव्हरलाही दीड लाखांच्या जवळपास रुपये दंड भरावा लागला आहे. आता दंडाच्या पावतीचा आणखी एक विक्रम झाला आहे. 

नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा कायदा लागू करण्यात आला आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांच्या कारवाईचा अंदाज आला नाही. पण, नेमके रविवारीच अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे उपद्रवी चालकांना चांगलाच दणका बसला आहे. गेल्या 10 दिवसांत शासनाच्या तिजोरीत मोठी रक्कमही दंडाच्या स्वरुपात जमा झाली आहे.  राजस्थानमधील एका ट्रक ड्रायव्हरने ट्रक ओव्हरलोडिंगचा दंड म्हणून चक्क 1,41,700 रुपयांचे चलन फाडले होते. त्यानंतर, पुन्हा एकदा दिल्लीतील मुबारका चौकात एका ट्रक ड्रायव्हरला मोठा दंड भरावा लागला आहे. तब्बल 2 लाख 500 रुपयांची पावती या ट्रक ड्रायव्हरने फाडली आहे. ट्रक ओव्हरलोडिंगचा नियम मोडल्याचा दंड म्हणून या ट्रक ड्रायव्हरकडून ही दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. आजपर्यंत वसुल करण्यात आलेल्या दंडाच्या रकमेतील सर्वाधिक दंडाची रक्कम असलेली ही पावती असल्याचे समजते.   

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसdelhiदिल्ली