शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश यांच्या हत्येशी आमचा काही संबंध नाही - सनातन संस्थेने केला हत्येचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 12:07 IST

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्या हत्येचा सनातन संस्थेने निषेध केला असून या हत्येशी सनातन संस्था अथवा हिंदू जनजागृती समिती यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे

ठळक मुद्देसनातन संस्थेवर हिंदुत्वविरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप अनेक महिन्यांपासून होत आहेडॉ. विरेंद्र तावडे व संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड यांना दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विनाकारण गोवल्याचा दावा

बेंगळुर - पत्रकार व सामाजिक कार्यकर्ती गौरी लंकेश यांच्या हत्येचा सनातन संस्थेने निषेध केला असून या हत्येशी सनातन संस्था अथवा हिंदू जनजागृती समिती यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. हिंदू कार्यकर्ते आणि डाव्या विचारसरणीचे लोक यांच्यात वैचारिक मतभेद आहेत, परंतु म्हणून डाव्या विचारसरणीच्या लोकांचा खून हिंदू कार्यकर्त्यांनी केला असं मानणं चुकीचं आहे असं सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बेंगळुर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

आम्ही विचारांचा मुकाबला विचारांनी केला आहे आणि लोकशाही मार्गाने जात कायदेशीर उपाय केले आहेत असा दावा राजहंस यांनी केला. गोवास्थित सनातन संस्थेवर हिंदुत्वविरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप अनेक महिन्यांपासून होत आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी विशेष चौकशी समितीला सहकार्य करण्याची संस्थेची तयारी असल्याचेही राजहंस म्हणाले. गोव्यातील पोंडा या मुख्यालयात यावे आणि अधिकाऱ्यांनी चौकशी करावी असे त्यांनी सांगितले. या हत्येशी संदर्भात अद्याप पोलीसांनी संस्थेची चौकशी केली नसल्याचेही ते म्हणाले.

काही राजकीय नेते, ढोंगी मुक्त विचारसरणीचे लोक आणि पत्रकार हिंदुत्ववादी संघटनांवर लंकेश यांची हत्या केल्याचा बेछुट आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव व वकिल संजीव पुनाळेकर यांनी असा आरोप केला आहे की, हिंदू जनजागृती समितीचे नेते डॉ. विरेंद्र तावडे व संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड यांना नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विनाकारण गोवण्यात आले आहे.
गौरी लंकेश प्रकरणी तपास पथकानं नक्षली, कौटुंबिक कलह, मालमत्ता वाद, स्थानिक वाद आणि लंकेश यांना मिळत असलेला निधी या अंगानं चौकशी करायला हवी असं मत पुनाळकर यांनी व्यक्त केलं आहे. विशिष्ट बनावटीच्या पिस्तुलानं लंकेश यांची हत्या झाली यावरून विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी हत्या केली असा निष्कर्ष काढणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. याप्रकरणी संस्था व समिती या दोघांना गोवणं गैर असल्याचं ते म्हणाले.

दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांची हत्या ज्या शस्त्रांनी झाली त्याबाबत उलटसुलट अहवाल असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. पोलीसांनीच यासंदर्भात उलट सुलट मतं व्यक्त केल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं आहे. विशेष तपास पथकाला सनातन संस्थेची चौकशी करायची असेल तर त्यास आम्ही तयार आहोत असं पुनाळेकर म्हणाले. तपास पथकं स्थानिक पोलीसांच्या मदतीनं काही साधकांना फोन करून माहिती घेत असल्याचे पुनाळेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशCrimeगुन्हा