शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगाल, आसाममध्ये आज मतदान

By admin | Updated: April 11, 2016 02:25 IST

आसाममधील विधानसभेच्या उर्वरित ६१ जागांसाठी आज सोमवारी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान घेण्यात येणार आहे. यासोबतच पश्चिम बंगालच्या ३१ जागांवरही निवडणुकीच्या पहिल्या

कोलकाता/गुवाहाटी : आसाममधील विधानसभेच्या उर्वरित ६१ जागांसाठी आज सोमवारी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान घेण्यात येणार आहे. यासोबतच पश्चिम बंगालच्या ३१ जागांवरही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या भागाचे मतदान घेण्यात येईल. आसाममध्ये काँग्रेस, भाजपा-आगप-बीपीएफ आघाडी आणि एआययूडीएफ यांच्यादरम्यान तिहेरी लढत आहे.आसाममध्ये या ६१ जागांसाठी ५२५ उमेदवार रिंगणात आहेत आणि या मतदारसंघांमध्ये १२,६९९ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यावेळी १,०४,३५,२७२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी ५० हजारांवर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.पश्चिम बंगालच्या ३१ विधानसभा मतदारसंघात २१ महिलांसह १६३ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. पश्चिम मिदनापूर, बांकुरा आणि बुर्दवान या जिल्ह्यांमध्ये हे मतदारसंघ आहेत. ७० लाख मतदार येथे मतदानाचा आपला हक्क बजावतील. या सर्व मतदारसंघात सत्तारूढ तृणमूल काँग्रेस, डावी आघाडी-काँग्रेस युती आणि भाजपा यांच्यात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचार सभांमध्ये, ‘मी (बॅनर्जी) सर्व २९४ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहे,’ असे सांगत मतदारांना तृणमूल काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले होते. मतदानाचा पहिला टप्पा ४ एप्रिल रोजी पार पडला होता. (वृत्तसंस्था)