शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 10:55 IST

Virar Building Collapse: विरारमध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेदरम्यान घडलेली एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे.

विरारमध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेदरम्यान घडलेली एक हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. या दुर्घटनेत इथे राहणाऱ्या जोईल कुटुंबातील मायलेकीचा मृत्यू झाला आहे. तर वडील बेपत्ता आहेत. दु:खद बाब म्हणजे जोईल कुटुंब त्यांच्या लेकीचा पहिला वाढदिवस साजरा करत असतानाच अचानक इमारत कोसळून ही दुर्घटना झाली.

विरार पूर्व परिसरात असलेल्या विजयनगर येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये ओंकार जोईल आणि त्यांचं कुटुंब राहत होते. दुर्घटना घडली त्याच दिवशी ओंकार जोईल यांची लेक उत्कर्षा हिचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. जोईल कुटुंबीयांनी घर सजवलं होतं. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचे फोटो नाकेवाईकांना पाठवण्यात आले. मात्र केक कापून अवघी पाच मिनिटं झाली असतानाच रमाबाई अपार्टमेंट या  इमारतीचा एक भाग कोसळून जवळच्या चाळीवर कोसळला. या दुर्घटनेत उत्कर्षा जोईल आणि तिच्या आईचा मृत्यू झाला. तर ओंकार जोईल हे दुर्घटना झाल्यापासून बेपत्ता आहेत.

दरम्यान, ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी आपला जीव धोक्यात घालत सात जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारांसाठी विरार आणि नालासोपारा येथील रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले आहे. विरार पोलिसांनी या दुर्घटनेसाठी जबाबदार बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :VirarविरारAccidentअपघातBuilding Collapseइमारत दुर्घटना