शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्या, मोदी, चोक्सीने बुडवलेली 40 टक्के रक्कम बॅंकांना परत; जप्त संपत्तीतून दिली भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 06:54 IST

बँकांचा एनपीए होणार कमी; जप्त संपत्तीतून दिली भरपाई

नवी दिल्ली : बँकांकडून कर्जे घेऊन परदेशात पसार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या, प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी ९०४१.५ कोटी रुपये कर्ज देणाऱ्या बँकांना परत करण्यात आले आहेत. यामुळे बँकांच्या बुडालेल्या २२ हजार कोटी रुपयांपैकी सुमारे ४० टक्के रक्कम परत मिळाली आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाने या तीनही उद्योगपतींची १८,१७०.०२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यापैकी ९०४१.५ कोटींची मालमत्ता बँकांकडे हस्तांतरित केली. मल्ल्याच्या युनायटेड ब्रेवरिज लि. कंपनीचे ५८२४.५० कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकण्याला कर्ज वसुली संचालनालयाने बुधवारी स्टेट बँकेला परवानगी दिली. याआधीच या कंपनीचे वर्ग केलेले शेअर्स व आताचे शेअर्स मिळून ६६२४ कोटींचे शेअर्स ईडीने स्टेट बँकेकडे वर्ग केले. बँकांनी यापूर्वीच मल्ल्याच्या कंपनीचे शेअर्स विकून १३७५ कोटी वसूल केले आहेत.

बँकांकडून कर्ज घेऊन परदेशात पसार झालेल्या या त्रिकुटाने केलेल्या गैरव्यवहारांची चौकशी अंमलबजावणी संचालनालय, तसेच सीबीआयकडून केली जात आहे. पंजाब नॅशनल बँकेला हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी फसविले असून, ती रक्कम १३ हजार कोटी रुपये असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. 

मद्यसम्राट अशी ओळख सांगणाऱ्या विजय मल्ल्या आणि त्याच्या किंगफिशर एअर लाइन्सने केलेला घोटाळा ९ हजार कोटी रुपयांचा आहे. अशा प्रकारे या त्रिकुटाने केलेल्या घोटाळ्यांची रक्कम २२,५८५.८३ कोटी रुपये आहे. चौकशीमध्ये या तिघांनीही बनावट व्यक्ती व संस्था दाखवून पैशांचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मनी लँड्रिंगचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

नीरव मोदीची याचिका फेटाळली

भारतामध्ये प्रत्यार्पण करण्याला विरोध करणारी नीरव मोदीची याचिका इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, त्याविरोधात अपील दाखल करणाऱ्याला पाच दिवसांची मुदत दिली आहे.  पंजाब नॅसनल बँकेमधील घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी याला भारतामध्ये परत पाठविण्याला ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री प्रीती पटेल यांनी १६ एप्रिल रोजी परवानगी दिली होती. या विरोधात नीरव मोदीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्याने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये काहीच अर्थ नसल्याचे सांगत न्यायमूर्तींनी त्याची याचिका फेटाळली आहे. १९ मार्च २०१९ रोजी त्याला अटक करण्यात आली असून, तेव्हापासून तो लंडनच्या तुरुंगातच आहे.

याचिका फेटाळली

याआधीच अन्य बँकांनी नीरव मोदीकडून १०६० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे या त्रिकुटाकडून बँकांना मिळालेली रक्कम ही ९०४१.५ कोटी रुपयांची असल्याचे ईडीने जाहीर केले आहे. या तीनही उद्योगपतींमुळे बँकांना झालेल्या एकूण तोट्यापैकी ४० टक्के रक्कम ही आतापर्यंत वसूल झाली असल्याचा दावाही ईडीतर्फे करण्यात आला आहे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याbankबँकNirav Modiनीरव मोदीfraudधोकेबाजी