VIDEO: स्तुती ऐकून सीएम नितीश कुमार भारावले, थेट भाजप नेत्याच्या पायाला स्पर्श केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 19:50 IST2024-11-03T19:49:49+5:302024-11-03T19:50:38+5:30

CM Nitish Kumar : नितीश कुमार यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडताना दिसले आहेत.

VIDEO: CM Nitish Kumar overwhelmed by praise, directly touches BJP leader's feet | VIDEO: स्तुती ऐकून सीएम नितीश कुमार भारावले, थेट भाजप नेत्याच्या पायाला स्पर्श केला

VIDEO: स्तुती ऐकून सीएम नितीश कुमार भारावले, थेट भाजप नेत्याच्या पायाला स्पर्श केला

CM Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांची चर्चा होत आहे. नितीश कुमार चित्रगुप्त पूजेसाठी आले असता, त्यांनी भाजपचे माजी राज्यसभा खासदार आरके सिन्हा यांच्या पाया पडले. 

पाटणा शहरातील आदि चित्रगुप्त मंदिरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीश कुमार आणि आरके सिन्हा उपस्थित होते. यावेळी भाषणात आरके सिन्हा यांनी नितीश कुमारांचे तोंडभरुन कौतुक केले आणि मंदिराच्या नूतनीकरणासाठी त्यांचे आभार मानले. 

भाजपचे माजी राज्यसभा खासदार नितीश कुमार यांचे कौतुक करताना म्हणाले की, या मंदिराची अवस्था अतिशय वाईट होती, मात्र नितीश कुमार यांनी लक्ष देऊन या मंदिराचे रूप पालटले. मंदिराचे आज जे रुप पाहायला मिळते, याचे संपूर्ण श्रेय नितीश कुमार यांना जाते. हे ऐकताच नितीश कुमार आनंदी झाले आणि त्यांनी मंचावर आरके सिन्हा यांच्या पायाला स्पर्श केला. 

दरम्यान, नितीश कुमार यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाय पडताना दिसले आहेत. याशिवाय, त्यांनी कामे लवकर करुन घेण्यसाठी अनेकदा आपल्या अधिकाऱ्यांच्या पायांनाही स्पर्ष केला आहे. 

Web Title: VIDEO: CM Nitish Kumar overwhelmed by praise, directly touches BJP leader's feet