शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 08:27 IST

भाजपासाठी खरे तर ती एक ऐतिहासिक घटना होती; कारण त्या राज्यात पक्ष पहिल्यांदाच सत्तेवर आला आहे. जानेवारीत गृह मंत्रालयाने राष्ट्रीय गीतासंदर्भात जारी केलेल्या निर्देशामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

-हरीश गुप्ता, नवी दिल्ली 
राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम्' गाण्याच्या मुद्द्यावर, टीव्हीके प्रमुख विजय यांनी भाजपला बॅकफूटवर ढकलले. रविवारी विजय यांच्या शपथविधीत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत, राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम्' गायले गेले. शेवटी, 'वंदे मातरम्' व 'जन गण मन' राष्ट्रगीतानंतर, 'तामिळ थाई वाळ्तू' हे राज्यगीत वाजवण्यात आले; हा क्रम याच पद्धतीने पाळला गेला.

याच्या एक दिवस आधी शनिवारी कोलकातात 'ब्रिगेड परेड ग्राउंड' वर सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी पार पडला, तेव्हा तिथे 'वंदे मातरम्' वाजवण्यात आले नव्हते. भाजपसाठी खरे तर ती एक ऐतिहासिक घटना होती; कारण त्या राज्यात पक्ष पहिल्यांदाच सत्तेवर आला आहे. 

१८८२ मध्ये प्रख्यात बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताच्या संदर्भात ही बाब विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखी आहे. जानेवारीत गृह मंत्रालयाने राष्ट्रीय गीतासंदर्भात जारी केलेल्या निर्देशामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

टागोरांचा अवमान म्हणत ममतांनी केला होता विरोध

बंगाल आणि तामिळनाडू यांसह चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला, 'जन गण मन' या राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. पश्चिम बंगालच्या तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निर्देशास रवींद्रनाथ टागोर यांचा अवमान असल्याचे संबोधले होते.

टागोर यांनी रचलेले राष्ट्रगीत, 'वंदे मातरम्' नंतर वाजवले जाऊ नये, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. गृह मंत्रालयाच्या या निर्देशामुळे, १९५० मध्ये संविधान सभेने स्वीकारलेल्या 'वंदे मातरम्'ची केवळ दोन कडवी गाण्याच्या प्रथेपासून फारकत घेतली गेली होती.

मल्लिकार्जून खरगे यांचे टीकास्त्र

या वादानंतर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे की, ही बाब अत्यंत विसंगत वाटते. जे लोक स्वतः राष्ट्रवादाचे रक्षक असल्याचा सातत्याने दावा करतात, त्यांनी स्वतः कधीही 'वंदे मातरम्' गायलेले नाही. यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान सर्व देश जाणतो, असे खरगे उपहासाने म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Mataram: BJP on Backfoot as Stalin Uses Song in TN

Web Summary : Stalin's use of 'Vande Mataram' during his oath ceremony put BJP on the defensive. Unlike in Bengal, where it was omitted during a similar event, Stalin prioritized it. Congress criticizes BJP's inconsistent patriotism.
टॅग्स :Thalapathy Vijayथलपती विजयTamilnaduतामिळनाडूChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल