Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians, 54th Match Result : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने रायपूरच्या मैदानात शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढत रोमहर्षक विजय नोंदवला. या सामन्यातील पराभवासह मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामातील प्लेऑफ्सच्या शर्यतीत बाहेर पडला आहे. अखेरच्या षटकात १५ धावांचा बचाव करण्यासाठी सूर्यकुमार यादवनं राज बावावर भरवसा दाखवला. अवांतर धावा खर्च करण्यासोबत मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे MI नं स्पर्धेत टिकून राहण्याची संधी शेवटची गमावली. क्रुणाल पांड्याने ७३ धावांच्या दमदार खेळीसह RCB च्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्रुणाल पांड्याची लढवय्या खेळी, MI नं संधी मिळाली तिथं चूक केली अन्...
१६७ धावांचा बचाव करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदजांनी उत्तम गोलदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. पण संघ अडचणीत असताना क्रुणाल पांड्या मैदानात तग धरून उभा राहिला. त्याने ४६ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७३ धावांची दमदार खेळी करत सामना RCB च्या बाजूनं फिरवला. स्नायू दुखापतीमुळे वेदनेनं व्याकूळ असताना त्याने अखेरच्या टप्प्यात मोठे फटके खेळत संघाला विजयाच्या समीप नेले. त्याची विकेट मिळवल्यावर सामना पुन्हा MI च्या बाजूनं झुकला होता. पण शेवटी १५ धावांचा बचाव करताना युवा गोलंदाज दबाव दिसला. त्याने अवांतर धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूवर जिथं एकही धाव गेली नसती तिथंही चूक झाली आणि RCB नं रोमहर्षक सामन्यात बाजी मारली.
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
भुवीनं MI च्या दोन्ही सलामीवीरांसह सूर्याची केली शिकार
पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. रायन रिकल्टन २ धावा काढून माघारी फिरला. रोहित शर्मानं दमदार सुरुवात केली. पण १० चेंडूत २२ धावांवर त्याच्या खेळीलाही ब्रेक लागला. दोन्ही सलामीवीरांना भुवनेश्वर कुमारनेच तंबूचा रस्ता दाखवला. एवढेच नाही तर कार्यवाहू कर्णधार सूर्यकुमार यादवला तर भुवीनं खातेही उघडू दिले नाही.
नमन धीरच्या उपयुक्त खेळीसह तिलक वर्माचं अर्धशतक
MI चा संघ अडचणीत अताना नमन धीर याने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय तिलक वर्मानं ४२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्याम दतीने केलेल्या ५७ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या होत्या. RCB कडून भुवीन सर्वाधिक ४ तर जोश हेजलवूड, रासिक सलाम आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
Web Summary : RCB defeated MI in a thrilling last-ball finish, eliminating Mumbai Indians from playoff contention. Krunal Pandya's valiant 73 propelled RCB. MI's fielding errors and extra runs proved costly despite Tilak Varma and Naman Dhir's efforts. Bhuvaneshwar Kumar's early wickets hurt MI.
Web Summary : RCB ने अंतिम गेंद पर रोमांचक मुकाबले में MI को हराया, जिससे मुंबई इंडियंस प्लेऑफ की दौड़ से बाहर हो गई। क्रुणाल पांड्या के 73 रनों ने RCB को आगे बढ़ाया। तिलक वर्मा और नमन धीर के प्रयासों के बावजूद, MI की फील्डिंग में त्रुटियां और अतिरिक्त रन महंगे साबित हुए। भुवनेश्वर कुमार की शुरुआती विकेटों ने MI को नुकसान पहुंचाया।