शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 06:09 IST

पेट्रोल-डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे, असे सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे. हैदराबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी जागतिक परिस्थितीचे गांभीर्य मांडले.

हैदराबाद : पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांना पेट्रोल, डिझेलसह इंधनबचतीचे आवाहन केले. 'वर्क फ्रॉम होम', ऑनलाइन बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा. पेट्रोल-डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे, असे सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे.

हैदराबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना मोदींनी जागतिक परिस्थितीचे गांभीर्य मांडले. 

पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरु करण्याची वेळ आलीये -मोदी

ते म्हणाले, 'जगातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कोरोनाकाळात आपण ऑनलाइन बैठका आणि 'वर्क फ्रॉम होम'ची सवय लावून घेतली होती. आता देशहितासाठी ती पद्धत पुन्हा अमलात आणण्याची वेळ आली आहे. यामुळे इंधनाचीच बचत होणार नाही, तर देशाचे कोट्यवधींचे परकीय चलनही वाचेल.'

युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी आल्याने सरकारी तेल कंपन्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. सध्या या कंपन्यांना दररोज सुमारे १,६०० ते १,७०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

रोज एक टक्का पेट्रोल-डिझेल वाचवा, देशाच्या अर्थव्यवस्थेला लागेल १४,८०० कोटी रुपयांचा हातभार

जर प्रत्येक नागरिकाने दररोज केवळ १ टक्का इंधन वाचवण्याचा संकल्प केला, तर भारत सरकारचे दरवर्षी तब्बल १४,८१९ कोटी रुपये वाचू शकतात. सध्या भारतात दररोज सुमारे १३.७ कोटी लिटर पेट्रोल आणि २९.४ कोटी लिटर डिझेल वापरले जाते. 

यामध्ये दुचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्सचा वाटा सर्वाधिक आहे. जर आपण दररोज केवळ १% इंधन वाचवले, तर दररोज १३.७ लाख लिटर पेट्रोलची बचत होईल. दररोज २९.४ लाख लिटर डिझेलची बचत होईल.

सोने खरेदीही नको, विदेशात जाणारा देशाचा पैसा वाचवा

पंतप्रधानांनी विशेषतः सोन्याच्या खरेदीवर भाष्य करताना म्हटले की, मी देशाला आवाहन करतो की, किमान एक वर्ष लग्नासाठी सोने खरेदी करू नका. सोन्याच्या आयातीमुळे आपला मोठा पैसा परदेशात जातो. तो पैसा वाचवून बँकांमध्ये जमा करा, जेणेकरून त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी व गरिबांच्या कल्याणासाठी होईल, असे मोदींनी नमूद केले.

१५ मेपूर्वी इंधन दरवाढ ? टांगती तलवार कायम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ७० डॉलरवरून थेट १२६ डॉलरवर पोहोचल्याने सरकारी तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

पेट्रोलवर २४ रुपये आणि सध्या सरकार प्रतिलिटर डिझेलवर ३० रुपयांचे नुकसान सोसत आहे. परिणामी, १५ मेपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात ४ ते ५ रुपयांची, तर घरगुती गॅस सिलिंडरमध्ये ४० ते ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid gold, cut fuel use, work from home: PM Modi

Web Summary : PM Modi urges Indians to save fuel amidst rising oil prices. He suggests 'work from home', online meetings, and postponing gold purchases to conserve resources and reduce financial strain due to global disruptions.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFuel Crisisइंधन टंचाईCrude Oilखनिज तेलLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईWarयुद्ध