शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 20:12 IST

1 / 6
मे महिना आला की घराबाहेर पडणे कठीण होते. घामाच्या धारा आणि चिलचिलाते ऊन यामुळे अंगाची लाहीलाही होत असते. अशा वेळी प्रत्येकाला वेध लागतात ते म्हणजे थंड हवेच्या ठिकाणांचे. जर तुम्हालाही या रखरखत्या उन्हापासून सुटका हवी असेल आणि मे महिन्यात डिसेंबरसारख्या गुलाबी थंडीचा आनंद घ्यायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची यादी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया, कुठे जाऊन तुम्ही हा थंडावा अनुभवू शकता.
2 / 6
लडाख: लडाखचे सौंदर्य एखाद्या स्वप्नासारखे वाटते. उंच पर्वत, निळे आकाश आणि हिरवेगार कुरण यामुळे लडाख पर्यटकांना भुरळ घालते. येथे तुम्हाला केवळ थंडावाच नाही, तर तिबेटी बौद्ध संस्कृतीचे दर्शनही घडते. रोड ट्रिप, बाइकिंग आणि ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांसाठी लडाख हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
3 / 6
मसुरी: 'क्वीन ऑफ हिल्स' म्हणून ओळखले जाणारे मसुरी हे थंड आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे. येथील मॉल रोड, केम्प्टी फॉल्स आणि गन हिल यांसारख्या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही उन्हाळ्याचा थकवा विसरून जाल. निसर्गाच्या सानिध्यात शांतता हवी असेल, तर मसुरीला नक्की पसंती द्या.
4 / 6
मनाली: जर तुम्हाला उन्हाळ्यात बर्फ पाहायचा असेल, तर मनालीला पर्याय नाही. हिमालयीन रांगांमध्ये वसलेले हे शहर आपल्या धबधब्यांसाठी आणि थंड हवामानासाठी ओळखले जाते. मनालीच्या डोंगरदऱ्यांमध्ये हरवून जाणे कोणत्याही पर्यटकासाठी स्वप्नवत असते. साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी मनाली म्हणजे पर्वणीच!
5 / 6
नैनिताल: डोंगरांच्या वेढ्यात वसलेले नैनिताल हे आपल्या नयनरम्य तलावांसाठी प्रसिद्ध आहे. येथील 'नैनी लेक'मध्ये बोटिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. थंड हवेत मॉल रोडवर फिरणे आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे, हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. उन्हाळ्यात कुटुंबासोबत जाण्यासाठी हे एक 'परफेक्ट' ठिकाण आहे.
6 / 6
कुफरी: शिमलापासून हाकेच्या अंतरावर असलेले कुफरी हे ठिकाण पर्यटकांचे आवडते केंद्र आहे. येथील ताजी हवा आणि आजूबाजूला असलेली हिरवळ तुमचे मन प्रसन्न करेल. दिल्ली आणि आसपासच्या भागातील उष्णतेपासून वाचण्यासाठी कुफरी हा उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता आणि निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यात साठवू शकता.
टॅग्स :tourismपर्यटनTravel Tipsट्रॅव्हल टिप्स