आयपीएल २०२६ च्या हंगामात MS धोनी CSK च्या संघाचा भाग असला तरी आतापर्यंत तो एकाही सामन्यासाठी मैदानात उतरलेला नाही.
आंतरारष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे IPL मध्येही महेंद्रसिंह धोनी फेअरवेल सामना न खेळताच निवृत्ती घेणार का? हा मुद्दा चर्चेत असताना आता एकाच सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा जोडीनं कॅप्टन कूलच्या खास विक्रमाशी बरोबरीचा डाव साधला आहे.
रायपूरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल स्पर्धेतील ५४ वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनी एकाच वेळी खास विक्रमाला गवसणी घातली.
कोहली आणि रोहित यांनी एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरताच या जोडीनं IPL स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली.
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात RCB चा स्टार बॅटर विराट कोहली IPL कारकिर्दीतील २७८ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.
कमालीचा योगायोग म्हणजे मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन करणाऱ्या रोहित शर्मानं विराटच्या RCB विरुद्ध IPL कारकिर्दीतील २७८ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. आणि दोघांनी एकाच सामन्यात MS धोनीची बरोबरी केली.
महेंद्रसिंह धोनीनं IPL च्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत २७८ सामने खेळले आहेत. कॅप्टन कूल चेन्नई सुपर किंग्सशिवाय पुणे फ्रँचायझी संघाकडून खेळताना दिसला आहे.
या तिघांच्या पाठोपाठ या यादीत रवींद्र जडेजाचा नंबर लागतो. त्याने वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून आतापर्यंत २६५ IPL सामने खेळले आहेत.