शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
6
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
7
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
8
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
9
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
10
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
11
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
12
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
13
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
14
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
15
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
16
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
17
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
18
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
19
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
20
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
Daily Top 2Weekly Top 5

"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 21:56 IST

"आयपॅक (I-PAC) सारख्या बाहेरच्या संस्थेने संपूर्ण पक्षावर ताबा मिळवला असून ईडीच्या कारवाईत तथ्य आढळल्यास ममता बॅनर्जी यांना जेलही होऊ शकते," असा खळबळजनक दावा दत्ता यांनी केला आहे. 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर्गत कलह चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. पक्षविरोधी भाष्य केल्याचा आरोप करत सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले पक्ष प्रवक्ते रिजू दत्ता यांनी आता ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. "आयपॅक (I-PAC) सारख्या बाहेरच्या संस्थेने संपूर्ण पक्षावर ताबा मिळवला असून ईडीच्या कारवाईत तथ्य आढळल्यास ममता बॅनर्जी यांना जेलही होऊ शकते," असा खळबळजनक दावा दत्ता यांनी केला आहे. 

एएनआयशी बोलताना रिजू दत्ता यांनी बंगाल पराभवाचे संपूर्ण खापर ममता आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर फोडले. ते म्हणाले, "प्रतीक जैन यांच्या घरावर ईडीने छापा टाकला, तेव्हा पक्षाचा डेटा सुरक्षित करण्यासाठी खुद्द 'दीदी' त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. सध्या त्यांच्या विरोधात ईडीचे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. याचा निकाल विरोधात गेल्यास ममतांना तुरुंगात जावे लागेल." एवढेच नाही तर, मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर आयपॅकचे संचालक विनेश चंदेल यांना जामीन मिळणे, याचा अर्थ दीदी विरोधात केस झाली आणि त्या गेल्यानंतर तुम्ही तो डेटा देऊन टाकला, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, रिजू दत्ता यांनी आयपीएस अजय पाल शर्मा यांच्यासंदर्भात तयार केलेल्या एका जुन्या व्हिडिओचाही उल्लेख केला. त्यांनी स्पष्ट केले की, हा व्हिडिओ त्यांनी वैयक्तिक टिप्पणी म्हणून केला नव्हता. तर तृणमूल काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते म्हणून पक्ष मुख्यालयातून आणि पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्ससाठी बनवला होता. मात्र, आता भाजपकडून होणारा वैयक्तिक रोष पाहता आणि कायदेशीर सल्लागारांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांनी आयपीएस अजय पाल शर्मा यांची बिनशर्त माफी मागितली. तसेच, "मी आता एक सामान्य नागरिक असून मला माझ्या कुटुंबासोबत शांततेत राहायचे आहे," असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचीही विनंती केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : TMC Leader: Mamata Banerjee Could Face Jail After Bengal Loss

Web Summary : TMC's Riju Dutta, suspended after Bengal's defeat, accuses Mamata Banerjee and Abhishek Banerjee of party control by I-PAC. He claims potential ED action could lead to Mamata's imprisonment. Dutta also apologized for a past video, seeking peace.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीPoliticsराजकारण