शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 16:33 IST

Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कर्नाटकच्या दौऱ्यावर होते.  या दौऱ्यादरम्यान,बंगळुरूच्या बाहेरील भागात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रम स्थळापासून जवळच स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी सुरक्षा दलांना खबरदारी घ्यावी लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कर्नाटकच्या दौऱ्यावर होते.  या दौऱ्यादरम्यान,बंगळुरूच्या बाहेरील भागात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रम स्थळापासून जवळच स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी सुरक्षा दलांना खबरदारी घ्यावी लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम नियोजित असलेल्या ठिकाणापासून जवळच दोन जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. या जिलेटिनच्या कांड्या कागलीपुराजवळील एका आश्रमाजवळच्या फुटपाथवर सापडल्या. या ठिकाणापासून मोदींच्या सभेचं ठिकाण हे तीन किलोमीटर अंतरावर होते. जिलेटिनच्या  कांड्या सापडल्यानंतर सुरक्षा दलांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम हाती घेण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान, संशयास्पद साहित्य सापडलं. शोधमोहिमेदरम्यान, फुटपाथच्या शेजारी जिलेटिनच्या दोन कांड्या सापडल्या. त्यानंतर  बॉम्बनाशक  पथक आणि फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात  आले. संपूर्ण परिसरात शोधमोहीम  सुरू करण्यात आली. तसेच  सुरक्षा व्यवस्थाही आणखी कडेकोट करण्यात आली.

या घटनेनंतर  पोलिसांनी सखोल तपासाला  सुरुवात केली आहे. तसेच एका संशयिताला ताब्यात घेण्यात  आले असून, त्याची सखोल चौकशी केली जात आहे.  तसेच या जिलेटिनच्या  कांड्या तिथे कशा आल्या. यामागे कुठलंही कटकारस्थान तर  नाही ना, याचाही शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnatakकर्नाटक