शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचलला टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
3
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
4
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
5
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
6
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
7
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
8
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
9
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
10
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
11
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
12
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
13
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
14
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
15
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
16
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
17
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
18
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
19
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
20
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:58 IST

Vande Mataram In दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज झालेल्या शपथविधी वेळी एक अशी घटना घडली ज्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आज झालेल्या शपथविधी वेळी एक अशी घटना घडली ज्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. तसेच या माध्यमातून टीव्हीके आणि विजय यांनी भाजपाच्या हातून एक मोठा मुद्दा हिसकावल्याचं बोललं जात  आहे.

आज झालेल्या विजय यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सहा कडव्यांचे वंदे मातरम हे गीत  कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाजवण्यात आले. एकीकडे वंदे मातरमबाबतभाजपाने नेहमीच आग्रही भूमिका घेतलेली आहे. तर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी वंदे मातरम् या गीताला विरोध करत ते न वाजवण्याचे आदेश दिलेले होते. त्यात काल पश्चिम  बंगालमध्ये झालेल्या भाजपाच्या सरकारच्या शपथविधीवेळीही वंदे मातरम हे गीत वाजवले गेले नव्हते. मात्र विजय यांच्या शपथविधीमध्ये पूर्ण वंदे  वाजवण्यात  आल्याने या निर्णयाची आता  चर्चा होत आहे.

विजय यांच्या शपथविधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हेही मंचावर  उपस्थित होते.  तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदे मातरम हे गीत वाजवण्यात आले. त्यानंतर जन गण  मन... हे राष्ट्रगीत आणि तमिल थाई वल्थू हे तामिळनाडूचे राज्यगीत वाजवण्यात आले. सर्वसाधारणपणे तामिळनाडू सरकारच्या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक प्रमाणे तमिल थाई... हे गीत वाजवले. जाते. मात्र विजय यांच्या शपथविधीवेळी वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

अनेक स्वातंत्र्यसैनिकांचं प्रेरणास्थान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताची रचना प्रसिद्ध बंगाली लेखक,  कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली होती. मात्र काल झालेल्या पश्चिम बंगाल सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमात हे गीत वाजवण्यात आले नव्हते. मात्र विजय यांच्या शपथविधी वेळी हे  गीत वाजवून  वंदे मातरमसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या भाजपाची कोंडी केल्याचे बोलले जात  आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay's move in Tamil Nadu: Upstaging BJP with 'Vande Mataram'?

Web Summary : Actor Vijay's oath ceremony in Tamil Nadu sparked debate by playing 'Vande Mataram,' a song previously avoided by the state government and even absent at a West Bengal event. This is seen as a political move, potentially stealing a key issue from the BJP.
टॅग्स :Thalapathy Vijayथलपती विजयChief Ministerमुख्यमंत्रीTamilnaduतामिळनाडूBJPभाजपाVande Mataramवंदे मातरम