शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचलला टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
3
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
4
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
5
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
6
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
7
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
8
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
9
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
10
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
11
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
12
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
13
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
14
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
15
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
16
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
17
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
18
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
19
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
20
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 14:44 IST

"ज्या जनतेने आपल्याला मतदान केले, त्यांना पुन्हा फसवू नका. 'आपण पूर्ण करता येतील अशीच आश्वासने देऊ,' असे म्हणत आपण सत्तेवर आला आहात..."

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच जोसेफ विजय यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात  २०० युनिट मोफत वीज, महिला सुरक्षेसाठी टास्क फोर्स आदी घोषणांचा समावेश आहे. मात्र, याच वेळी त्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवरही भाष्य केले. यावरून आता तमिळनाडूती राजकारण तापले आहे. विजय यांनी, राज्यावरील १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. यावरून आता माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. के. स्टालिन चांगलेच भडकले आहेत.

एम के स्टॅलिन यांनी जोसेफ विजय यांना शुभेच्छा देतानाच जोरदार टीका केली. ते म्हणाले, "सरकारकडे पैसे नाहीत, असे लगेचच म्हणायला सुरुवात करू नका. पैसा आहे. मात्र, गरज आहे ती केवळ तो जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या इच्छाशक्तीची आणि शासन करण्याची क्षमता दाखवण्याची". दरम्यान, आपण आपल्या कार्यकाळात कोविड आणि पुरासारख्या संकटांना तोंड देत, तसेच केंद्रातील भाजप सरकारच्या दुर्लक्षानंतरही अनेक कल्याणकारी योजना राबवल्याचा दावाही त्यांनी केला.

मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय

"मुद्दा भरकटवू नका" -
जोसेफ विजय यांच्यावर निशाणा साधताना एम के स्टॅलीन म्हणाले, गत सरकारने १० लाख कोटींचे कर्ज ठेवल्याचा आरोप करून मुद्दा भरकटवू नका. पुन्हा जनतेची फसवणूक करू नका. तामिळनाडूच्या कर्जाची पातळी ही विहित मर्यादेतच आहे. आम्ही फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पातच राज्याची आर्थिक स्थिती संदर्भात माहिती दिली होती. तुम्हाला याची माहिती नव्हती का? आपण केवळ पोकळ आश्वासनेच दिलीत का? असा सवालही स्टॅलीन यांनी यावेळी केला.

ज्या जनतेने आपल्याला मतदान केले, त्यांना पुन्हा फसवू नका -
एवढेच नाही तर, ज्या जनतेने आपल्याला मतदान केले, त्यांना पुन्हा फसवू नका. "आपण पूर्ण करता येतील अशीच आश्वासने देऊ," असे म्हणत आपण सत्तेवर आला आहात. मला विश्वास आहे की, आपणही आमच्या प्रमाणेच जनतेला दिलेली आश्वासने कशा पद्धतीने पूर्ण करायची असतात, ते लवकरच शिकाल. आपल्या राजवटीतही तामिळनाडूचा विकासा सुरूच राहो यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा! असेही स्टॅली म्हणाले.

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूThalapathy Vijayथलपती विजयPoliticsराजकारण