अमरावती - आई म्हणजे केवळ नाते नाही, ती जगण्याची पहिली प्रेरणा आहे. मुलाच्या प्रत्येक यशामागे उभी असलेली शांत ताकद म्हणजे आई. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” ही ओळ केवळ काव्य नाही, तर मातृत्वाचे सत्य अधोरेखित करणारा जीवनमंत्र आहे. रविवार, १० मे रोजी मातृदिनाच्या निमित्ताने अशीच एक सत्य कहाणी जिथे आईने केवळ मुलाला जन्मच दिला नाही, तर त्याला पुन्हा नवजीवनही दिले.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे मागील नऊ वर्षांत ३६ मातांनी आपल्या मुलांना किडनी दान करून मातृत्वाचा सर्वोच्च अर्थ प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. या घटनेत वैद्यकीय यश नक्कीच आहे, पण त्याहून मोठे आहे ते आईच्या मनातील प्रेम आणि निर्धार. जेव्हा मुलाच्या शरीरात गंभीर आजाराने घर केले, तेव्हा अनेक कुटुंबांमध्ये भीतीचे सावट होते.
डायलिसिसच्या थकवणाऱ्या प्रवासात आणि अनिश्चित भविष्यात आईने आधार दिला. शस्त्रक्रियेचा धोका पत्करून स्वतःचा एक अवयव देण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते; पण आईसाठी मुलाचे जीवन हेच सर्वात मोठे ध्येय असते. मातृदिन केवळ शुभेच्छांचा दिवस नाही; तो आईच्या निःस्वार्थ त्यागाची जाणीव करून देणारा क्षण आहे. आई ही घराची आधारस्तंभ असते. तिच्या प्रेमामुळे कुटुंब एकत्र राहते, तिच्या संस्कारांमुळे समाज घडतो आणि काही वेळा तीच आई आपल्या मुलासाठी नव्या आयुष्याची दात्री ठरते.
छाया सोळंकी यांचे रुग्णालयातील पहिले दान
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुरुवात ४ एप्रिल २०१८ रोजी झाली, तर पहिल्या मातेचे किडनी दान हे ९ जून २०१८ मध्ये झाले. बैतूल जिल्ह्यातील छाया दुर्गादास सोळंकी या मातेने शुभम सोळंकी या आपल्या मुलाला किडनी दान केली होती. सुपरमध्ये आतापर्यंत तब्बल ७० किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या असून, यात सर्वाधिक ३७ मातांनी किडनी दान केले आहे.
२०१८ पासून रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असून, आतापर्यंत २७ मार्च २०२६ पर्यंत ७० किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यात सर्वाधिक ३६ मातांनी किडनी दान केले आहे.
डॉ. अमोल नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
Web Summary : In Amravati, 37 mothers selflessly donated kidneys to their children at a Super Speciality Hospital, showcasing ultimate maternal love. Since 2018, the hospital has performed 70 kidney transplants, with mothers being the primary donors, offering their children a new lease on life and embodying selfless sacrifice.
Web Summary : अमरावती में, 37 माताओं ने सुपर स्पेशलिटी अस्पताल में निस्वार्थ रूप से अपने बच्चों को किडनी दान की, जो मातृ प्रेम का চূড়ান্ত उदाहरण है। 2018 से, अस्पताल ने 70 किडनी प्रत्यारोपण किए हैं, जिनमें माताएँ प्राथमिक दाता रही हैं, जिन्होंने अपने बच्चों को जीवन का एक नया पट्टा दिया।