शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
5
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
6
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
7
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
8
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
9
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
10
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
12
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
13
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
14
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
15
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
16
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
17
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
18
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
19
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
20
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 12:11 IST

मनीष यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक कॉन्स्टेबल म्हणूनच केली होती. त्यानंतर विभागीय परीक्षा देत ते उपनिरीक्षकपदापर्यंत पोहचले.

नवी दिल्ली - उत्तर पूर्व जिल्ह्यातील करावल पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका उपनिरीक्षकाने डिमोशनची मागणी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनीष यांनी स्वेच्छेने पदावनतीची विनंती केली होती आणि आता डीसीपींनी त्यांची विनंती मान्य करून त्यांना पुन्हा कॉन्स्टेबल बनवण्यात आले आहे.

मनीष यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एक निवेदन देत म्हटलं की, मला उपनिरीक्षक पदावर काम करण्यास रस नाही. मला पुन्हा कॉन्स्टेबल बनवावे अशी मागणी केली. या अनोख्या मागणीने सगळेच त्याची चर्चा करू लागले. मनीष यांच्या मागणीनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. या मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी मनीष यांची पडताळणी करण्यात आली. ज्यात त्यांच्याविरोधात कुठलीही विभागीय, गुन्हेगारी अथवा देखरेख समितीचा खटला प्रलंबित आहे का हे पाहिले गेले. त्यानंतर उपायुक्त यांनी मनीष यांचा अर्ज स्वीकारत त्यांना कॉन्स्टेबल बनवले.

माहितीनुसार, मनीष यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक कॉन्स्टेबल म्हणूनच केली होती. त्यानंतर विभागीय परीक्षा देत ते उपनिरीक्षकपदापर्यंत पोहचले. परंतु प्रमोशननंतर वाढत्या जबाबदाऱ्या आणि व्यस्तता यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. मनीष यांना शिक्षणात खूप रस होता. ते स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. उपनिरीक्षक पदामुळे मिळणारा कमी वेळ अभ्यासासाठी पुरेसा नाही. त्यामुळे पुन्हा कॉन्स्टेबल बनून ते अभ्यासासाठी जास्त वेळ देऊ इच्छितात असं त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी सांगितले.

मनीष २०१८ साली पोलीस खात्यात भरती झाले होते. तेव्हापासून ते विविध परीक्षांची तयारी करत आहे. २०२३ साली दिल्ली पोलिसांच्या विभागीय परीक्षेत त्यांनी यश मिळवले त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण केल्यावर मनीष करावल येथे उपनिरीक्षक म्हणून काम पाहू लागले. नव्या नियमानुसार उपनिरीक्षकांना त्यांच्या सेवा काळात ६-७ जिल्ह्यात काम करणे बंधनकारक असते. त्यात मनीष यांनी अभ्यासासाठी मिळणारा कमी वेळ लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डिमोशन करण्याची विनंती केली. त्यानंतर ही विनंती मान्य करत मनीष यांना पुन्हा कॉन्स्टेबल करण्यात आले. 

टॅग्स :Policeपोलिस