Join us
Daily Top 2Weekly Top 5

ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 10:07 IST

Mother's Day Special Story: दोन वर्षापूर्वी रिटा सिंग यांचा मुलगा आयुष कार्तिक मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्याच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू आहेत.

मुंबई : 'आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते', या वाक्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे येत आहे. रिटा सिंग या आपल्या मुलाच्या उपचारासाठी स्वतःची एक किडनी दान करणार असून, लवकरच त्याच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. तळोजा येथे राहणाऱ्या रिटा सिंग यांना दोन मुले आहेत. त्यांच्या २४ वर्षीय आयुष कार्तिक लहान मुलाला त्यांनी किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन वर्षापूर्वी रिटा सिंग यांचा मुलगा आयुष कार्तिक मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्याच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा डायलिसिस करावे लागत होते. याचा आयुषच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्यानंतर आई रिटा सिंग यांनी स्वतःची एक किडनी मुलाला दान करण्याचा निर्णय घेतला.

रिटा सिंग यांचा रक्त गट ओ पॉजिटिव्ह

आणि मुलाचा ए पॉजिटिव्ह आहे. त्यांच्या मुलावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये किडनी विकारतज्ज्ञ डॉ. श्रीरंग बिच्छू यांच्या देखरेखीखाली खाली उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सर्व तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून, आई आणि मुलगा दोघांचीही प्रकृती शस्त्रक्रियेसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसातच ही शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

मी काही यामध्ये फार काही वेगळे करते असे वाटत नाही. वैद्यकीय सल्ला माझ्या आरोग्याच्या तपासणी करून घरच्यांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. आमच्या सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या असून, लवकरच मी माझ्या मुलाला किडनी देणार आहे.
-रिटा सिंग, आयुषची आई

किडनी प्रत्यारोपण ही अत्यंत संवेदनशील प्रक्रिया असली तरी योग्यवेळी उपचार मिळाल्यास रुग्णाला नवजीवन मिळू शकते. अवयवदानाबाबत समाजात जागृती निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आई मुलाला किडनी देत असली तरी अनेक वैद्यकीय चाचण्या आणि कायदेशीर प्रक्रिया पार कराव्या लागतात. सध्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. आई आणि मुलाच्या नात्यात किडनी देण्याचे प्रमाण अधिक आहे.
-डॉ. श्रीरंग बिच्छू, किडनी विकार तज्ज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल

English
हिंदी सारांश
Web Title : Mother's love: Donating kidney to save son's life.

Web Summary : Rita Singh, a mother from Mumbai, is donating her kidney to her 24-year-old son, Ayush, who suffers from kidney failure. Doctors at Bombay Hospital have completed necessary tests, and the transplant surgery is scheduled soon. This act exemplifies a mother's selfless love.
टॅग्स :मदर्स डेअवयव दानमुंबई