शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 21:20 IST

कोरोना काळाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची एक प्रभावी व्यवस्था विकसित केली होती. आजची परिस्थिती बघता, या व्यवस्था पुन्हा सुरू करणे, देश हिताचे ठरेल."


पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर जाणवत आहेत. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी देशवासीयांना मोठे आवाहन केले आहे. "पेट्रोल आणि डिझेलचा वापर संयमाने करायला हवा आणि 'वर्क फ्रॉम होम'ला पुन्हा प्राधान्य द्यायला हवे," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी कोरोना काळाचाही उल्लेख केला. ते रविवारी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या शेजारी एक मोठे युद्ध सुरू आहे, याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. मात्र भारताला त्याचा अधिकच गंभीर फटका बसला आहे. भारताकडे स्वतःचे मोठे तेलसाठे नाहीत. आपल्याला आपली गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खते, परदेशातून आयात करावी लागतात. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत या वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत."

कोरोना काळाचा उल्लेख करत काय म्हणाले मोदी? -
कोरोना काळाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची एक प्रभावी व्यवस्था विकसित केली होती. आजची परिस्थिती बघता, या व्यवस्था पुन्हा सुरू करणे, देश हिताचे ठरेल." तसेच, "आपण इंधनाची बचत करून आपण देशाचे मौल्यवान परकीय चलन वाचवू शकतो, हे प्रत्येक नागरिकाचे उत्तरदायित्व आहे."

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदीचं देशवासीयांना मोठं आवाहन -
जागतिक युद्धाचा भारतावर होणारा परिणाम आणि विस्कळीत झालेली पुरवठा साखळी यावर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकारने नागरिकांवर आर्थिक भार पडू नये, म्हणून स्वतः दबाव स्वीकारला आहे, मात्र आता नागरिकांनीही इंधन बचतीचा संकल्प करायला हवा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, जेथे मेट्रो उपलब्ध आहे तेथे तिचा वापर करावा, कार पूलिंगला प्रोत्साहन द्यावे आणि किमान एक वर्ष परदेश दौरे अथवा परदेशातील लग्नसोहळे टाळून देशांतर्गत पर्यटनावर भर द्यावा. तसेच, एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यापासून रोखणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी देशवासीयांना केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Save fuel, resume work from home: PM Modi appeals.

Web Summary : Amidst global economic concerns, PM Modi urges citizens to conserve fuel, prioritize work from home, and boost domestic tourism. He highlighted the impact of international conflicts and emphasized collective responsibility in saving foreign exchange reserves.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलDieselडिझेलWarयुद्धIranइराणAmericaअमेरिका