नाशिक : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये एसआयटीने भोंदू अशोक खरातप्रकरणी रविवारी चौकशी केली. सकाळी गुन्हे अन्वेषन विभागाच्या कार्यालयात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते, डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांनी ५० मिनिटे चाकणकर यांचा जबाब घेतला.
एसआयटीने मागील महिन्यातच चाकणकर यांना नाशिकमध्ये चौकशीस हजर राहण्याबाबत पत्र दिले होते. परंतु चाकणकर यांनी तांत्रिक कारणे देऊन नाशिकला येण्यास नकार दिला होता. अखेर त्यांना रविवारी यावेच लागले. पुण्यातून नाशिकला चौकशीसाठी जाताना त्यांनी तीन वेळा कार बदलली.
महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना पदाचा गैरवापर केल्याचा चाकणकर यांच्यावर ठपका आहे. खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर चाकणकर व खरातचे कनेक्शन बाहेर आले होते. चाकणकर या खरात याच्या सिन्नर येथील शिवनिका ट्रस्टवर सदस्या देखील होत्या. या सर्व अनुषंगाने चाकणकरांची चौकशी करण्यात आली.
खरातला गुरू मानायचे : रूपाली चाकणकर
माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून, मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते, असे रूपाली चाकणकर यांनी एसआयटीसमोर स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खरात याची दुसरी बाजू मला माहीत नव्हती, असा दावा चाकणकर यांनी एसआयटीसमोर केला. माझे अन् खरातचे आर्थिक संबंध नसून खरातकडे जाण्यासाठी मी कोणासही आग्रह केला नाही, अशी बाजूदेखील चाकणकर यांनी चौकशीत मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रुपाली चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती
नाशिकमध्ये एसआयटीने त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यात खरातशी संबंध, मिळालेली मदत, तक्रारींची सोडवणूक, शिवनिका ट्रस्टमधील भूमिका आणि कॉल रेकॉर्ड्सबाबत कसून चौकशी करण्यात आली.
Web Summary : Rupali Chakankar faced SIT questioning in Nashik regarding the Ashok Kharat case. She claimed spiritual connection, denying financial ties or pressuring anyone to visit Kharat. Chakankar was questioned about her role in Shivnika Trust and call records.
Web Summary : रूपाली चाकणकर से नासिक में अशोक खरात मामले में एसआईटी ने पूछताछ की। उन्होंने आध्यात्मिक संबंध का दावा किया, वित्तीय संबंधों या किसी पर खरात से मिलने का दबाव डालने से इनकार किया। चाकणकर से शिवनिका ट्रस्ट में उनकी भूमिका और कॉल रिकॉर्ड के बारे में पूछताछ की गई।