Nepal Plane Fire: काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना तुर्कीश एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग लागली. आग आटोक्यात आली असून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
"तुर्कीश एअरलाइन्सचे विमान टीके ७२६ इस्तंबूलहून काठमांडूला येत होते आणि उतरताना त्याच्या टायरला आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती विमानतळ सुरक्षा विभागाचे विशेष अधीक्षक, राजकुमार सिलवाल यांनी दिली.
विमानात २७८ प्रवासी
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात एकूण २७८ प्रवासी आणि ११ कर्मचारी होते. प्रवाशांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे काही अधिकारी होते.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमध्ये विमानाच्या उजव्या बाजूच्या लँडिंग गिअरला आग लागलेली दिसत आहे आणि जमिनीवरून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. आपत्कालीन दरवाजांमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत विमानतळ किंवा विमान कंपनीकडून कोणतेही अधिकृत निवेदन किंवा घोषणा करण्यात आलेली नाही.
Web Summary : A Turkish Airlines plane caught fire upon landing in Kathmandu. All 278 passengers and 11 crew members evacuated safely. The fire, originating from a tire, was quickly extinguished by firefighters. No casualties reported.
Web Summary : काठमांडू में उतरते समय तुर्की एयरलाइंस के एक विमान में आग लग गई। सभी 278 यात्रियों और 11 चालक दल के सदस्यों को सुरक्षित निकाला गया। टायर से शुरू हुई आग को दमकल कर्मियों ने तुरंत बुझा दिया। कोई हताहत नहीं।