शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

'सिरम'च्या अदर पूनावाला यांनी टोचून घेतली लस; 'कोविशिल्ड' सुरक्षित असल्याचा देशाला दिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 1:32 PM

अदर पूनावाला यांनी स्वतः 'कोविशील्ड' लस टोचून घेत लस सुरक्षित असल्याचा देशाला दिला संदेश...

पुणे : अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या व जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या'सिरम' इन्स्टिट्यूट निर्मित 'कोविशिल्ड' या कोरोना प्रतिबंधक लसचे देशात आजपासून लसीकरण सुरु झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर ठिकठिकाणी लसीकरणाला सुरुवात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

गेल्या काही महिन्यांपासून अविरत मेहनत व संशोधन करून 'कोविशिल्ड' या लसीद्वारे जगाला कोरोना संकटावर मात करण्यासाठी आशेचा किरण दाखविलेल्या 'सिरम' इन्स्टिटयूटच्या आज सुरु झालेल्या लसीकरण मोहिमेद्वारे ध्येयपूर्ती झाली आहे. याचवेळी लस सुरक्षित असल्याचा महत्वपूर्ण संदेश देत सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला यांनी स्वतः 'कोविशील्ड' लस टोचून घेतली आहे. ही माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओ सादर करत दिली आहे. गेले अकरा महिने कोरोनाच्या साथीचा सर्वांनीच नेटाने सामना केला. कोरोनावरील लस कधी येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अँस्ट्रॉझेनिका कंपनीने विकसित केलेल्या कोव्हीशिल्ड लसीचे उत्पादन झाले. तीन टप्प्यामध्ये मानवी चाचण्या पार पडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर कोव्हीशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली. लसीकरणाला शनिवारी सुरुवात झाल्यानंतर पुनावाला यांनीही स्वतः लस टोचून घेतली. लस सुरक्षित असल्याचा संदेश त्यांनी या कृतीतून देशाला दिला आहे.

लसीकरण मोहीमेबद्दल मी संपूर्ण देशाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी यशस्वी लसीकरण मोहीम भारतात पार पडत आहे. कोव्हीशिल्डच्या यशामागे अनेकांचे परिश्रम आहेत. या यशाचा मला अभिमान वाटतो. लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, हा संदेश आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी लसीकरण करून घेत आहे, अशा आशयाचे ट्विट अदर पुनावाला यांनी केले आहे.

'सिरम'कडे सध्या जगाचं लक्ष लागून आहे. कारण लस उत्पादनाची जगातील सर्वात मोठी क्षमता सीरमकडे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीचं उत्पादन करण्याचे हक्क सीरम इन्स्टिट्यूटने मिळवले होते. त्यामुळे कोरोना संकटावर मात करण्यासाठी भारतासह जगाला या लसीबाबत प्रचंड उत्सुकता होती.

आदर पूनावाला यांनी साधारण जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान कोरोना लस उपलब्ध होईल अशी माहिती दिली होती. केंद्र सरकारने लास वापराबाबत हिरबवा कंदील दाखविल्यानंतर या लसीची भारतासह जगाला उत्सुकता होती. १२ जानेवारीला देशभरात कोविशील्ड लस रवाना करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना लसीकरणाची सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. तसेच लसीकरणादरम्यानची सर्वतोपरी काळजी देखील रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.  

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या