शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडात पुन्हा रावत ‘राजवट’

By admin | Updated: May 12, 2016 04:37 IST

विधानसभेत झालेल्या शक्तिपरीक्षेवर बुधवारी मंजुरीची मोहर लावल्यामुळे, सहा आठवड्यांपूर्वी पदच्युत झालेले काँग्रेसचे नेते हरीश रावत पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार आहेत

नवी दिल्ली/डेहराडून : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी उत्तराखंड विधानसभेत झालेल्या शक्तिपरीक्षेवर बुधवारी मंजुरीची मोहर लावल्यामुळे, सहा आठवड्यांपूर्वी पदच्युत झालेले काँग्रेसचे नेते हरीश रावत पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारला हा फार मोठा हादरा आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्राने राष्ट्रपती राजवट रात्री उशिरा मागे घेतली.सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, रावत यांना ६१ पैकी ३३ मते मिळाली आहेत. मतदानात गैरप्रकार झाला नसून, नऊ आमदारांना अपात्रतेमुळे मतदान करता आले नाही. रावत यांनी विश्वासमत जिंकल्याचे न्यायालयाने जाहीर करताच, डेहराडूनमध्ये जल्लोष झाला.उत्तराखंडमध्ये विनियोग विधेयकावरील मतदानात काँग्रेसच्या नऊ आमदारांनी भाजपाच्या बाजूने मतदान केल्यावर, केंद्राने राज्यातील रावत सरकार बडतर्फ करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर, विधानसभा अध्यक्षांनी या बंडखोर आमदारांना पक्षांतर कायद्यानुसार अपात्र जाहीर केले होते. उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला, तर सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेपास नकार दिला. हरीश रावत यांनी बहुमत सिद्ध केले असून, याबाबत कुठलाही संशय नसल्याचे महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सांगितले. रावत यांचे वकील कपिल सिब्बल यांनी हा एक निष्पक्ष निर्णय असल्याचे मत मांडले. राष्ट्रपती राजवट हटविल्यानंतर त्वरित रावत पदभार सांभाळतील. आम्ही केंद्र सरकारला उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतचा वटहुकूम मागे घेण्याची परवानगी देत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. राष्ट्रपती राजवट हटविल्याच्या आदेशाची प्रत दोन दिवसांनंतर सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. पीठाने सांगितले की, राष्ट्रपती राजवटीचा वटहुकूम योग्य ठरविण्यासंबंधी याचिका २८ मार्चला दाखल करण्यात आली होती आणि उच्च न्यायालयाने त्यावर निर्णय दिला होता, परंतु त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असल्याने ही याचिका कायम राहील. त्याचप्रमाणे, नऊ अपात्र आमदारांनीही उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले असून, आम्ही याबाबत काहीही बोलणार नाही. आम्ही या नऊ आमदारांची अपात्रता रद्द केल्यास आणखी एक शक्तिपरीक्षा होईल. (वृत्तसंस्था)———-मंत्रिमंडळाची बैठकरावत यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, दुपारी पाऊण वाजताच्या सुमारास संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाची छोटेखानी बैठक झाली आणि त्यानंतर उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हटविण्याची शिफारस करण्यात आली. .................रावत यांनी मध्यावधीची शक्यता फेटाळलीडेहराडून : उत्तराखंड विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर, हरीश रावत यांनी बुधवारी राज्यात मध्यावधीची शक्यता फेटाळली. गेल्या दोन महिन्यांतील घटनाक्रमामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करणे आणि राजकीय मतभेद बाजूला सारून राज्याला विकासमार्गावर आणण्यास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्याच्या प्रगतीसाठी सहकार्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.