शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणतात, होत असलेला विरोध केवळ राजकीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 08:12 IST

आंदोलकांची पोलिसांशी झटापट; केंद्राचे संघटनांना पत्र

एस.के. गुप्तानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याच्या विरोधात गुरुवारी पंजाबहून दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पंजाब-हरयाणा सीमेवर अडवण्यात आले. शेतकऱ्यांनी उग्र प्रदर्शन केल्यावर त्यांची पोलिसांशी झटापटही झाली.  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पंजाबच्या या शेतकऱ्यांचे हे वर्तन राजकारणाने प्रेरित असल्याचे म्हटले. तोमर म्हणाले, नव्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांचे हित जपले आहे. मंडयांत त्यांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी आणि आपले पीक एमएसपीपेक्षाही जास्त भावाने विकण्याची पूर्ण संधी त्यांना दिली गेली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडेय यांनी पंजाबमधील ३२ शेतकरी संघटनांना पत्र लिहून नव्या कृषी सुधारणा कायद्यांतील शंका दूर करण्यासाठी चर्चेला निमंत्रित केले आहे. शेतकरी नेत्यांची ही चर्चा मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासोबत  होईल. तोमर म्हणाले की, राज्यांना हवे असेल, तर ते त्यांच्याकडील मागणीनुसार राज्याच्या कृषी कायद्यांत दुरुस्ती करून एमएसपीची तरतूद करू शकतात. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी बोलायला मी तयार आहे. देशात शेतकरी केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी सुधारणा कायद्यांना विरोध करीत नाहीत. हा विरोध विरोधी पक्षांकडून होत आहे. कारण एमएसपी जुन्या किंवा नव्या कृषी कायद्यात लिहिली गेली आहे, असेही तोमर म्हणाले.सरकार अधिकृत निवेदनात एमएसपी कायम राखून मंडया बंद न होण्याचे आश्वासन देत आहे. 

शेतकऱ्यांचे आंदोलन यासाठी...n एमएसपी संपण्याची भीती. कारण मंडईच्या बाहेर पीक विकण्याचा मार्ग मोकळा केला गेला.n सरकारने विधेयकात मंडया संपवण्यात येईल, असे म्हटलेले नाही.n विना कर शेतकरी मंडईच्या बाहेर जेव्हा पीक विकेल तेव्हा मंडईची गरज संपून जाईल. दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना विनामंडई एमएसपी कशी मिळेल? - शेतकरी असा युक्तिवाद करीत आहेत की, अडते किंवा व्यापारी त्यांचे ६-७ टक्के कराचे नुकसान न करता मंडईतून बाहेर खरेदी करतील. यामुळे शेतकऱ्यांचे शोषण वाढेल.n कंत्राटी शेतीत शेतकऱ्यांचा कोर्टात जाण्याचा हक्क काढून घेण्यात आला आहे. कंपन्या आणि शेतकरी यांच्यातील वादावर एसडीएम निर्णय घेईल.

टॅग्स :agricultureशेतीministerमंत्रीFarmerशेतकरी