शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समजून घ्या ‘कोरोना’, धार्मिक स्थळी जाताना जरा जपून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 05:06 IST

राज्यात व देशात दरवर्षी गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवताच्या पूजेनिमित्त भरणाºया जत्रा या ही स्थानिक पातळीवर नागरिकांनी एकत्रित निर्णय घेऊन रद्द केलेल्या चांगल्या.

लॉकडाऊन ५ मध्ये सर्वधर्मीय धार्मिक तीर्थस्थळ आणि प्रार्थनास्थळ खुली केली असली तरी काही निर्णय जनतेने स्वत: घ्यायला हवे. केंद्र सरकारने धार्मिक स्थळ व प्रार्थनास्थळ खुली करताना ६५ वर्षांवरील, १० वर्षांखालील, गर्भवती स्त्रिया, सर्व वयोगटात मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, कॅन्सर व असे मोठे आजार असलेल्यांनी धार्मिक स्थळी जाऊ नये असे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने एवढ्यांनाच सतर्क केले असले तरी लक्षणविरहीत (कुठले ही लक्षण नसलेले) कोरोनाबाधितांची संख्या पाहता आजार असो व नसो तसेच सर्वच वयोगटाच्या व्यक्तींनी धार्मिकस्थळी व प्रार्थनास्थळांना जाणे कोरोना संसर्गाची जोखीम वाढवणारा महत्त्वाचा घटक ठरू शकतो. कोरोनाच नव्हे इतर जंतुसंसर्ग पसरण्यासाठी गर्दीमुळे तीर्थस्थळे व धार्मिकस्थळे मोठे कारण ठरले आहे व कोरोनाच्या बाबतीतही हे खरे ठरू शकते.

राज्यात व देशात दरवर्षी गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवताच्या पूजेनिमित्त भरणाºया जत्रा या ही स्थानिक पातळीवर नागरिकांनी एकत्रित निर्णय घेऊन रद्द केलेल्या चांगल्या. अशा जत्रा झाल्या तरी सध्या तरी तिथे जाणे टाळावे. पुजारी किंवा त्या स्थळाची जबाबदारी असणाऱ्यांनी मास्क, फेस शिल्ड वापरावे व मुख्य देव्हारा व दर्शनच्या जागेत किमान ८ फूट अंतर ठेवावे. धार्मिक स्थळाची जबाबदारी असणाºयांना ताप, सर्दी, खोकला झाल्यास त्यांनी १४ ते २० दिवस मंदिरात इतरांच्या संपर्कात येऊ नये.अशा ठिकाणी गर्दी खूप असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे शक्य नसे तरी हे नियम पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा व दर्शन रांगेत ६ फुटांचे गोल आखून घ्यावे व त्यातच दर्शनासाठी आलेल्यांनी उभे राहावे. मंदिरात येताना प्रत्येकाला मास्क अनिवार्य असावा व त्याशिवाय कोणाला ही बाहेर सोडू नये. मंदिराबाहेर हात धुण्यासाठी बेसिन व लिक्विड सोप शक्यतो अ‍ॅटोमेटेड (आपोआप सोप हातावर पडेल असे सेन्सर असलेले) सोय असावी. तीर्थक्षेत्र यांच्याशी एक मोठे अर्थकारण निगडित असले व हा सगळ्यांच्याच भावनेचा प्रश्न असला तरी साथ रोखण्याच्या दृष्टीने वर्षभर तरी धार्मिक स्थळी न जाता घरच्या घरीच पूजा अर्चा केलेली योग्य ठरेल.- अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिर