शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

15 जानेवारीला होणारी UGC-NET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 22:13 IST

UGC NET Exam: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 15 जानेवारी रोजी होणारी UGC-NET परीक्षा पुढे ढकलली आहे.

UGC NET Exam: नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने 15 जानेवारी रोजी होणारी UGC NET परीक्षा पुढे ढकलली आहे. NTA ने सांगितले की, बुधवार (15 जानेवारी 2025) रोजी होणारी UGC NET परीक्षा पोंगल आणि मकर संक्रांती सणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, परीक्षेची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे एनटीएचे म्हणणे आहे. 

तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री गोवी चेझियान यांनी केंद्र सरकारला पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर 14-16 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा शेड्युल करण्याची विनंती केली होती. त्यांनी या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना एक पत्र देखील लिहिले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, 'NTA ने UGC NET डिसेंबर 2024 ची परीक्षा 3 ते 16 जानेवारी 2025 दरम्यान शेड्यूल केली आहे. पोंगल 14 जानेवारीला असला तरी, त्यानंतर 15 जानेवारीला तिरुवल्लुवर दिवस (मट्टू पोंगल) आणि 16 जानेवारीला शेतकरी दिन (उझावर थिरुनल किंवा कानुम पोंगल) येतो.

तमिळनाडू सरकारने 14 ते 16 जानेवारी 2025 पर्यंत पोंगल निमित्त सुटी जाहीर केली आहे, असेही ते म्हणाले होते. पोंगलच्या सुटीत नेट परीक्षा घेतल्यास सणाच्या काळात परीक्षेच्या तयारीला अडथळा निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

प्रवेशपत्र जारीNTA ने अलीकडेच 15 आणि 16 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षांसाठी प्रवेशपत्र जारी केले होते आणि उमेदवारांना UGC NET ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा सल्ला दिला होता.

85 विषयांसाठी परीक्षा UGC NET 2024 परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 85 विषयांसाठी घेतली जात आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जात आहे. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी साडेनऊ ते साडेबारा आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेत दोन पेपर असतात. पेपर 1 मध्ये 100 गुणांचे 50 प्रश्न असतात, तर पेपर 2 उमेदवाराने निवडलेल्या विषयावर 200 गुणांचे 100 प्रश्न असतात.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थी