Two Police personnel lost their lives and one injured firing by terrorists Nowgam | Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. श्रीनगरमध्ये असलेल्या नवगाम येथे दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत तर एक जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. नवगाम येथे शुक्रवारी (14 ऑगस्ट) पोलीस पथकावर हल्ला झाला. नवगाम बायपासजवळ नाकाबंदीच्या वेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आहेत. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या परिसराला घेराव घातला असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारी

"मी काय केलं होतं?, माझ्या घरावर का हल्ला केला?, माझं घर का पेटवलंत?"

Video - कडक सॅल्यूट! पीपीई किट काढताना अशी होते कोरोना योद्ध्यांची अवस्था, वाहतात घामाच्या धारा

CoronaVirus News : काय सांगता? कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेत

15 ऑगस्ट! पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून मागितली 'ही' गोष्ट, म्हणाले...

'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल 

"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Two Police personnel lost their lives and one injured firing by terrorists Nowgam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.