'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:51 AM2020-08-13T11:51:53+5:302020-08-13T12:02:40+5:30

गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे न सोडण्यात आल्याने भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

bjp ashish shelar slams maharashtra government over not arrange railway traveling konkan | '"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल 

'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल 

Next

मुंबई - भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे न सोडण्यात आल्याने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. '"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?' असं म्हणत शेलारांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी गुरुवारी (13 ऑगस्ट) याबाबतचे ट्विट केले आहे. 

"कुठलाही ठोस निर्णय नाही, कसले नियोजन, समन्वय नाही, केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचे कौशल या राज्यातील "पाडून दाखवा सरकारकडे"आहे. कोकणातरेल्वे गाड्या सोडण्यावरुन हेच सुरू आहे. रेल्वेची तयारी असतानाही गाड्या राज्य सरकारने सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

"आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण ऐकले नाही.. एसटी वेळेत दिली नाही. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागले.. आता परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसलेत. "पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?" असं देखील शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

ई-पासच्या मुद्द्यावरून शेलार यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. 'ई- भूमीपूजन" करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप "ई पास" देऊ शकले नाहीत. त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा. चाकरमान्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करणार होते एसटीच्या गाड्या सोडणार होते..कधी? कोकणी माणसाचा अंत पाहू नका' असं म्हटलं होतं.  

महत्त्वाच्या बातम्या

"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"

CoronaVirus News : चिंता वाढली! 5 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा लागण, डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण

Video - "स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही"

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण, चिंताजनक आकडेवारी

सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं

कडक सॅल्यूट! ...अन् गर्भवती महिलेसाठी आमदार ठरले देवदूत, डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केली प्रसूती

बापरे! बाईक दिली नाही म्हणून 'तो' 100 फूट उंच विजेच्या खांबावर चढला अन्..

Corona Vacine : 20 वर्षांपासूनच्या शोधाची कमाल; रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच

Web Title: bjp ashish shelar slams maharashtra government over not arrange railway traveling konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.