CoronaVirus News : काय सांगता? कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:11 PM2020-08-13T15:11:15+5:302020-08-13T15:15:15+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना नेमका कसा आणि कुठून पसरला याबाबत अद्याप कोणताही ठोस माहिती समोर आलेली नाही. याच दरम्यान कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी थायलंडमध्ये संशोधक वटवाघुळाच्या गुहेमध्ये पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

CoronaVirus Marathi News thailand scientists trek cave collect sample of bats | CoronaVirus News : काय सांगता? कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेत

फोटो - Associated Press

Next

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही तब्बल दोन कोटींच्या वर गेली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनासंदर्भात संशोधन करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. कोरोना नेमका कसा आणि कुठून पसरला याबाबत अद्याप कोणताही ठोस माहिती समोर आलेली नाही. याच दरम्यान कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी थायलंडमध्ये संशोधक वटवाघुळांच्या गुहेमध्ये पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

वटवाघुळांपासून कोरोना पसरला अशी माहिती याआधी काही रिपोर्टमधून समोर आली होती. त्यामुळेच कोरोना व्हायरसचं मूळ शोधून काढणं हा थायलंडमधल्या संशोधकांचा मूळ उद्देश आहे. त्यासाठी वटवाघुळांचा अधिवास असलेल्या गुहेमध्ये जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. खेड्यापाड्यांमधून ट्रेकिंग करत आहेत. रिपोर्टनुसार, हार्सशू वटवाघुळांमध्ये कोरोनाशी मिळताजुळता एक व्हायरस आढळून आला आहे. 

थायलंडमध्ये हार्सशू वटवाघुळाच्या 19 प्रजाती आहेत. मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही चाचणी झालेली नाही असे संशोधकांनी सांगितले. थायलंडच्या साई योक नॅशनल पार्कमध्ये तीन वेगवेगळया गुहांमधून येणारी वटवाघुळे पकडण्यासाठी संशोधकांनी जाळे लावले होते. थाई रेड क्रॉस इन्फेकशियस डिजीस हेल्थ सायन्स सेंटरच्या टीमने वटवाघुळांची लाळ, रक्त आणि स्टूलचे नमुने घेतले. त्यानंतर त्यांना सोडून दिले. 

रिसर्च टीमचे प्रमुख सॉपोर्न वचारापल्सडे यांनी या टीमचे नेतृत्व केले आहे. वटवाघुळे आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या आजारांचा ते 20 वर्षांपासून अभ्यास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा उद्रेक झाला असून सातत्याने धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाचा ग्राफ वेगाने वाढताना दिसून येत आहे. खबरदरीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

15 ऑगस्ट! पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून मागितली 'ही' गोष्ट, म्हणाले...

'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल 

"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"

CoronaVirus News : चिंता वाढली! 5 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा लागण, डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण

Video - "स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही"

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण, चिंताजनक आकडेवारी

सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं

Web Title: CoronaVirus Marathi News thailand scientists trek cave collect sample of bats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.