CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण, चिंताजनक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 08:34 AM2020-08-13T08:34:35+5:302020-08-13T08:50:31+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत 20,806,983 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे.

कोरोनाचा उद्रेक झाला असून सातत्याने धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाचा ग्राफ वेगाने वाढताना दिसून येत आहे. खबरदरीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.

जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत 20,806,983 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाच्या संकटात अनेकांनी व्हायरसवर मात करून ही लढाई जिंकली आहे. तब्बल 13,706,678 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र याच दरम्यान रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

कोरोनाचा धोका वाढला असून चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

जगभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6644 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे. महासत्ता अशी ओळख असलेला हा देश कोरोनापुढे हतबल झाला आहे.

अमेरिकेत आतापर्यंत 53.60 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाख 69 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे.

गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची संख्या ही भारत, ब्राझील आणि अमेरिकेतील आहे. तसेच याच तीन देशांमध्ये मृतांचा आकडा देखील वाढत आहे.

जगभरातील 20 देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही दोन लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये इराण, पाकिस्तान, तुर्की, इटली, जर्मनी या देशांची समावेश आहे.

कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. तर मृतांच्या संख्येत चौथ्या स्थानी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.