इराण-अमेरिकेमध्ये तणाव, इंडिगोचा मोठा निर्णय; ११ फेब्रुवारीपर्यंत अनेक देशांत उड्डाणे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:08 IST2026-01-27T18:55:18+5:302026-01-27T19:08:26+5:30
इराणमधील वाढत्या तणाव आणि प्रादेशिक सुरक्षेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने एक मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने मध्य आशियाई शहरांमध्ये, यामध्ये तिबिलिसी, अल्माटी, बाकू आणि ताश्कंद यांचा समावेश आहे. सर्व उड्डाणे ११ फेब्रुवारीपर्यंत स्थगित केली आहेत.

इराण-अमेरिकेमध्ये तणाव, इंडिगोचा मोठा निर्णय; ११ फेब्रुवारीपर्यंत अनेक देशांत उड्डाणे रद्द
मागील काही दिवसापासून इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव सुरू आहे. दरम्यान, आता सुरक्षेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, भारताची सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने एक मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मध्य आशियाई शहरांमध्ये, तिबिलिसी (जॉर्जिया), अल्माटी (कझाकस्तान), बाकू (अझरबैजान) आणि ताश्कंद (उझबेकिस्तान) यासह सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. इराणच्या आसपासच्या घडामोडी आणि हवाई क्षेत्राशी संबंधित जोखीम लक्षात घेऊन हे सावधगिरीचे आणि सक्रिय पाऊल उचलण्यात आल्याचे इंडिगोने स्पष्ट केले आहे.
याबाबत इंडिगोने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये "इराणच्या सभोवतालच्या घडामोडी लक्षात घेता, आम्ही काही उड्डाण वेळापत्रकात अतिरिक्त बदल केले आहेत. आम्ही सावध आणि सक्रिय दृष्टिकोन घेत आहोत, प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.", असंही या निवेदनात म्हटले आहे. इंडिगोने म्हटले आहे की, उड्डाण वेळापत्रकात अतिरिक्त बदल करण्यात आले आहेत आणि परिस्थिती विकसित होत असताना ऑपरेशन्सचा सतत आढावा घेतला जात आहे.
प्रवासी पर्यायी प्रवास पर्यायांचा शोध घेऊ शकतात किंवा पैसे परत घेऊ शकतात, असे इंडिगोने सांगितले आहे. परिस्थिती सतत बदलत आहे, म्हणून उड्डाण ऑपरेशन्सचा आढावा घेतला जात आहे आणि कोणतेही अपडेट किंवा बदल वेळेवर कळवले जातील. तुमच्या संयम आणि सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असेही इंडिगोने सांगितले आहे.
रविवारी याआधी, एअरलाइनने २५ जानेवारी रोजी दिल्ली ते तिबिलिसी आणि मुंबई ते अल्माटी ही उड्डाणे रद्द केली होती. "आमच्या पहिल्या सल्ल्यानुसार आणि इराणभोवतीच्या अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आम्ही सुरक्षिततेवर सतत लक्ष केंद्रित करून आमच्या उड्डाण वेळापत्रकात काही सक्रिय बदल करत आहोत," असे एअरलाइनने म्हटले होते.