शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:00 IST

Chandrapur News: महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तहसीलअंतर्गत १४ वादग्रस्त गावे 'एक जमीन, दोन सरकार' या विचित्र परिस्थितीत अडकली आहेत. १०० टक्के मराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राचा महसूल विभाग आणि तेलंगणाचा वन विभाग या दोन्हींचा ताबा आहे.

- दीपक साबने जिवती (चंद्रपूर) - महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तहसीलअंतर्गत १४ वादग्रस्त गावे 'एक जमीन, दोन सरकार' या विचित्र परिस्थितीत अडकली आहेत. १०० टक्केमराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राचा महसूल विभाग आणि तेलंगणाचा वन विभाग या दोन्हींचा ताबा आहे. महाराष्ट्राच्या महसूल विभागाची सुमारे १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महाराष्ट्र सरकारने याबाबत पाऊल उचलले नाही.

तेलंगणाने नकाशा बदललासध्या वादग्रस्त गावातील जमिनीवरील वनांचे संरक्षण तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्याच्या केरामेरी मंडल येथील वन विभाग करीत आहे. वर्ष २०१७-१८ पासून महाराष्ट्रातील हजारो हेक्टर महसूल जमीन आणि जंगलाचे क्षेत्र तेलंगणा सरकारने आपल्या ताब्यात घेतले. तेलंगणाच्या नकाशातही ही गावे समाविष्ट केली आहेत.

यासंदर्भात मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाने अद्याप गांभीर्याने घेतले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी व तेलंगणा सरकारच्या ताब्यात असलेली जमीन परत घ्यावी. शेतकऱ्यांच्या ताब्यातील जमिनीचा सर्व्हे करून कायमस्वरूपी पट्टे द्यावे. - रामदास रणवीर, सामाजिक कार्यकर्ता, मुकदमगुडा, ता. जिवती

तीन दशके उलटली तरी...वर्ष १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या घटनेला तीन दशके उलटून गेल्यानंतरही पूर्वीचा आंध्र प्रदेश व सध्याचा तेलंगणा राज्य त्या निर्णयाची अंमलबजावणी टाळत आहेत.त्याहून चिंताजनक बाब म्हणजे, महाराष्ट्र शासनानेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. हा प्रश्न केवळ सीमावादाचा नाही; तर राज्याचा सन्मान, शेतकऱ्यांचे हक्क व संविधानिक निर्णयाच्या अंमलबजावणीचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Telangana claims Maharashtra villages, 15,000 acres despite court order.

Web Summary : Telangana controls 14 Maharashtra villages, including 15,000 acres, despite a Supreme Court ruling favoring Maharashtra. The state government's inaction raises concerns about land rights and constitutional implementation.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणा