शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

तेजस रेल्वेत करमणुकीची साधने

By admin | Updated: July 11, 2016 04:20 IST

तेजस या रेल्वेत करमणुकीची अद्ययावत साधने दाखल होणार आहेत. ही रेल्वे लवकरच कात टाकणार असून, वायफायसह अंधांसाठी ब्रेल लिपीत सूचना यात मिळणार आहेत.

नवी दिल्ली : तेजस या रेल्वेत करमणुकीची अद्ययावत साधने दाखल होणार आहेत. ही रेल्वे लवकरच कात टाकणार असून, वायफायसह अंधांसाठी ब्रेल लिपीत सूचना यात मिळणार आहेत. प्रवासाचा आनंद वाढविण्यासाठी प्रवाशांच्या सेवेला येणाऱ्या या रेल्वेचे डिझाईन तयार झाले आहे. तेजस, अंत्योदय आणि हमसफर या रेल्वेंमध्ये या सुविधा मिळणार आहेत. तेजसचे डबेही नव्या रंगांनी चमकणार आहेत, तर हमसफरच्या डब्यांवरचा आकाशी रंग आता प्रवाशांचे लक्ष आकर्षून घेणार आहे. अर्थात, हे आम आदमीचे वाहन आहे, हाच संदेश यातून देण्यात येणार आहे. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तेजस, हमसफर, अंत्योदय आणि दीन दयालूच्या डब्यांचे डिझाईन तयार आहे. तेजसमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेयर कार असेल. तसेच प्रवाशांच्या मनोरंजनासाठी स्क्रीन आणि हॅण्ड फोन सॉकेटबरोबर सुरक्षा निर्देश देण्यासाठी एलईडी बोर्ड असतील, तर हमसफरमध्ये थर्ड एसी डबे असतील. या अद्ययावत रेल्वेत बायो वॅक्यूम टॉयलेटमध्ये सेन्सरचे नळ असतील. ओले हात कोरडे करणाऱ्या मशिन्स असतील. तेजसमध्ये चहा व कॉफीच्या मशीन ठेवलेल्या असतील. दैनिक आणि स्नॅक्स टेबलही असतील. तेजस आणि हमसफर दोन्हीमध्येही सीसीटीव्ही तसेच आग विझविणारे यंत्र असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)