SIR प्रक्रियेनंतर तमिळनाडूतील अंतिम मतदार यादी जाहीर; 97 लाखांहून अधिक नावे वगळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 17:18 IST2026-02-23T17:18:31+5:302026-02-23T17:18:54+5:30

Tamil Nadu SIR: मतदारांना हरकती नोंदवण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Tamil Nadu SIR: Final voter list in Tamil Nadu released after SIR process; More than 74 lakh names excluded | SIR प्रक्रियेनंतर तमिळनाडूतील अंतिम मतदार यादी जाहीर; 97 लाखांहून अधिक नावे वगळली

SIR प्रक्रियेनंतर तमिळनाडूतील अंतिम मतदार यादी जाहीर; 97 लाखांहून अधिक नावे वगळली

Tamil Nadu SIR: तमिळनाडूमध्ये झालेल्या स्पेशल इंटेंसिव रिव्हिजन (SIR) प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने सोमवारी(23 फेब्रुवारी 2026) राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे. या पुनरावलोकन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आली असून, यामुळे राज्यातील एकूण मतदारसंख्येत लक्षणीय घट झाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

तमिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 97 लाख 37 हजार 831 मतदारांची नावे अंतिम यादीतून वगळण्यात आली आहेत. यानंतर राज्यातील एकूण मतदारसंख्या 5 कोटी 43 लाख 76 हजार 756 इतकी झाली आहे. SIR प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तमिळनाडूमध्ये 6 कोटी 41 लाख 14 हजार 587 मतदार नोंदणीकृत होते.

मोठ्या प्रमाणावर नावे वगळली; मृत मतदारांचा समावेश

निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, वगळण्यात आलेल्या नावांपैकी मोठा भाग मृत मतदारांचा आहे. याशिवाय स्थलांतर, दुहेरी नोंदणी आणि चुकीची माहिती यांसारख्या कारणांमुळेही अनेक नावे हटवण्यात आली आहेत. पात्र असूनही ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, ते नागरिक फॉर्म-6 च्या माध्यमातून पुन्हा अर्ज करू शकतात.

12 लाखांहून अधिक मतदारांना नोटिसा

SIR प्रक्रियेदरम्यान 12,43,363 मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. ज्या मतदारांच्या नावांमध्ये किंवा तपशिलांमध्ये त्रुटी आढळल्या, त्यांना आवश्यक कागदपत्रे, स्वघोषणापत्र निर्धारित कालावधीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन

निवडणूक आयोगाने सांगितले की, ही संपूर्ण प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या 30 जानेवारी 2026 च्या निर्देशांनुसार पार पाडण्यात आली आहे. या निर्देशांनुसार मतदारांची नावे वगळण्याची कारणे सार्वजनिक करणे अनिवार्य होते, त्याअनुषंगाने वगळलेल्या मतदारांची यादी ग्रामपंचायत कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, ब्लॉक व उपविभागीय कार्यालये, शहरी भागातील वॉर्ड कार्यालये
येथे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

हरकतीसाठी 10 दिवसांची मुदत

SIR प्रक्रियेत ज्यांची नावे वगळली गेली आहेत, अशा मतदारांना हरकती नोंदवण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी वेळेत आपली कागदपत्रे सादर करून मतदार यादीतील नाव कायम ठेवावे.

इतर राज्यांमध्येही मोठी छाटणी

दरम्यान, SIR च्या दुसऱ्या टप्प्यात 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे 8 टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तसेच, 14 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या पुद्दुचेरीच्या अंतिम मतदार यादीत 9,44,211 मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

Web Title : एसआईआर के बाद तमिलनाडु की अंतिम मतदाता सूची जारी; 97 लाख नाम हटाए गए

Web Summary : तमिलनाडु में विशेष गहन पुनरीक्षण (एसआईआर) के बाद अंतिम मतदाता सूची जारी की गई। मृत्यु, प्रवास और दोहरी पंजीकरण के कारण 97 लाख से अधिक नाम हटा दिए गए। कुल मतदाता संख्या अब 5.43 करोड़ है। प्रभावित नागरिक फॉर्म-6 से पुन: आवेदन कर सकते हैं।

Web Title : Tamil Nadu Releases Final Voter List After SIR; 9.7 Million Names Removed

Web Summary : Tamil Nadu's election body released the final voter list after a Special Intensive Revision (SIR). Over 9.7 million names were removed due to deaths, migration, and duplicate registrations. The total voter count is now 5.43 crore. Affected citizens can re-apply with Form-6.