शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

'निवार'नंतर तामिळनाडूला दुसरे चक्रीवादळ शुक्रवारी धडकण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 7:38 AM

या दुसऱ्या चक्रीवादळामुळे तामिळनाडू व केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

चेन्नई : तामिळनाडूला निवार चक्रीवादळ धडकून आठवडा पूर्ण होण्याच्या आतच आता दुसऱ्या चक्रीवादळाचा या राज्याला शुक्रवारी, २ डिसेंबर रोजी तडाखा बसण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

या दुसऱ्या चक्रीवादळामुळे तामिळनाडू व केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे या खात्याने सदर दोन राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हे दुसरे चक्रीवादळ घोंघावणार आहे. त्यावेळी ताशी ७५ ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.दुसऱ्या चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे तामिळनाडू, केरळमधील मच्छीमारांनी शुक्रवारी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात २६ नोव्हेंबरला निवार हे चक्रीवादळ तामिळनाडू, पुडुचेरीला धडकले होते. त्यामुळे तेथील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला व पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, निवार चक्रीवादळामुळे सुदैवाने मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली नाही.

टॅग्स :weatherहवामान