शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
4
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
5
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
6
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
7
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
8
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
9
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
10
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
11
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
12
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
13
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
14
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
15
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
16
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
17
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
18
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
19
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
20
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:04 IST

Vijay Wadettiwar Criticize Narendra Modi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. साहेब, देशाला बर्बाद करायचं कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?असा सवाल वडेट्टीवार यांनी मोदींना विचारला आहे. 

आखाती देशांमध्ये कायम असलेली तणावपूर्ण परिस्थिती, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे विस्कळीत होत  असलेला खनिज तेलाचा पुरवठा, डॉलरच्या तुलनेत घसरत असलेलं रुपयाचं मूल्य या पार्श्वभूमीवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना  पेट्रोल आणि डिझेलचा जपून वापर करण्याचं तसेच वर्षभर सोन्याची खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र  या आवाहनानंतर विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर चौफेर टीका होत आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. साहेब, देशाला बर्बाद करायचं कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?असा सवाल वडेट्टीवार यांनी मोदींना विचारला आहे. 

या संदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार यांनी लिहिले की, २००८ च्या महाभयंकर जागतिक मंदीतही ज्या देशाचं सुकाणू हललं नाही. मंदीचे चटके बसत असतानाही आपला देश सुरक्षित राहिला. तिथे आज महासत्तेच्या नावाखाली जनतेलाच त्याग करायला सांगितलं जातंय! २०१४ मध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज सांगतात पेट्रोल, डिझेल वापरू नका, सोनं घेऊ नका, खाद्यतेल कमी करा! साहेब, देशाला बर्बाद करायचं कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची? अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

यावेळी पाच राज्यांमधील  विधानसभा निवडणुका होईपर्यंत या मुद्द्यावर भाष्य न करण्यावरूनही वडेट्टीवार यांनी मोदींवर निशाणा साधला. पाच राज्याच्या निवडणुका होईपर्यंत युद्धाचा विसर पडला होता, आता निवडणुका संपल्या की लगेच 'त्याग' आठवला? सल्ले द्यायला फक्त पंतप्रधान, आणि भोगायला मात्र सामान्य जनता! वाह मोदीजी वाह!, असा टोला त्यांनी लगावला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wadettiwar Slams Modi: Why Public Bear the Brunt of Your Actions?

Web Summary : Vijay Wadettiwar criticizes PM Modi's call for public sacrifice amidst economic challenges. He questions why citizens should suffer for the government's actions, recalling past economic resilience and contrasting it with current austerity measures.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस