तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून थलापती विजय यांनी १० मे २०२६ रोजी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भव्य शपथ घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याला दाक्षिणात्य सुंदरी त्रिशा कृष्णनने आपली आई उमा कृष्णन यांच्यासह विशेष उपस्थिती लावली होती. विजयच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बसून त्रिशाने हा संपूर्ण सोहळा जवळून पाहिला. एका सुपरस्टारचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास पाहताना त्रिशाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान होते.
स्टेडियमबाहेर चाहत्यांनी घातला घेराव
शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर त्रिशा जेव्हा स्टेडियमच्या बाहेर पडली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हजारो चाहत्यांनी आणि पत्रकारांनी तिला अक्षरशः घेरले. ऐतिहासिक विजयावर आणि शपथविधीवर त्रिशाची पहिली प्रतिक्रिया काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वांची मोठी धडपड सुरू होती. अचानक आलेल्या या गर्दीमुळे स्टेडियमबाहेर काही काळ गोंधळ उडाला होता.
प्रचंड गर्दीतही त्रिशाने राखला संयम
पत्रकारांकडून होणारी प्रश्नांची सरबत्ती आणि चाहत्यांकडून होणारी धक्का-बुक्की अशा परिस्थितीतही त्रिशाने कमालीचा संयम राखला. कोणत्याही प्रकारचा संताप व्यक्त न करता ती अत्यंत धैर्याने आणि शांतपणे गर्दीतून मार्ग काढताना दिसली. या गोंधळातही तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम होते, तिच्या या वागण्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
त्रिशाच्या सौंदर्याची अन् लूकची चर्चा
या खास प्रसंगी त्रिशाच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साडीमधील तिचा शालीन लूक आणि चेहऱ्यावरची चमक पाहून चाहते फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असून, "विजयचा मुख्यमंत्री बनण्याचा यशाचा खरा आनंद त्रिशाच्या चेहऱ्यावर दिसत आहे," अशा चर्चांना उधाण आले आहे. विजय आणि त्रिशाच्या मैत्रीचे बंध या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
चित्रपट आणि आगामी प्रोजेक्ट्स
त्रिशाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्यासोबत 'करुप्पू' या चित्रपटात झळकणार आहे. आरजे बालाजी दिग्दर्शित हा चित्रपट १४ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. दुसरीकडे, मुख्यमंत्री बनलेल्या विजयचा शेवटचा चित्रपट 'जननायकन' सेन्सॉर बोर्डाच्या वादामुळे अडकला असून नुकताच त्याच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Web Summary : Following Thalapathy Vijay's CM oath, actress Trisha Krishnan, attending with her mother, was mobbed by fans. Despite the chaos, she remained calm, drawing praise for her composure and grace. Her elegant appearance also sparked admiration. She will soon appear in 'Karuppu' with Surya.
Web Summary : थलापथी विजय के मुख्यमंत्री पद की शपथ के बाद, अभिनेत्री त्रिशा कृष्णन, अपनी माँ के साथ समारोह में शामिल हुईं, प्रशंसकों से घिर गईं। अराजकता के बावजूद, वह शांत रहीं, जिसके लिए उनकी प्रशंसा हुई। उनकी सुंदरता की भी चर्चा हुई। वह जल्द ही सूर्या के साथ 'करुप्पू' में दिखेंगी।