Sushant Singh Rajput Suicide jdu maheshwar hazari say rhea chakraborty contract killer | Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"

Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"

नवी दिल्ली - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध (FIR Against rhea chakraborty) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बिहार पोलीस देखील मुंबईत दाखल झाले आहेत. याच दरम्यान बिहारचे मंत्री आणि जेडीयुचे नेते महेश्वर हजारी (Maheshwar Hazari)  यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. 

महेश्वर हजारी यांनी रियावर गंभीर आरोप करत तिला विषकन्या म्हटलं आहे. तसेच सुशांतच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत असल्याचा दावा देखील केला आहे. यासोबतच महाराष्ट्रपोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. "रिया चक्रवर्ती ही सुशांतसाठी विषकन्या ठरली आहे. सुशांच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत आहे. त्यांची नावं समोर आली पाहिजेत" असं महेश्वर हजारी यांनी म्हटलं आहे.

"रियाला हाताशी धरून या गँगने  सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याचे पैसे लंपास केले. नंतर भूत-प्रेत, काळी जादू असं नाटक केलं आणि सुशांतला अभिनयापासून दूर केलं. सुशांतच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या लोकांची नावं समोर आली पहिजेत. महाराष्ट्र पोलीस तपास योग्य दिशेने करत नाही आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशीची आम्ही मागणी करत आहोत" असं देखील हजारी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सुशांतच्या वडिलांनी सुरुवातीपासून रियाकडेच कसून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सुरुवातीला पोलिसांनी तिचा जबाबही नोंदविला. या प्रकारानंतर संशयाच्या घेऱ्यात असलेल्या रियाने सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. जर कोणाकडेही कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते आमच्याकडे सोपवावे. कोणीही या प्रकरणाचं राजकारण करू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. "जर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे सोपवावे. आम्ही दोषींची चौकशी करून त्यांना शिक्षा करू. मात्र या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांदरम्यान वाद उत्पन्न करण्यासासाठी करू नका" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 57,117 नवे रुग्ण, 16 लाखांचा टप्पा केला पार

Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

खरंच की काय? हजार, बाराशे नाही तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाख विजेचं बिल

CoronaVirus News : कोरोनाबाबत सर्च करणं पडू शकतं महागात, मानसिक आरोग्य धोक्यात, व्हाल 'डूम स्क्रोलिंग'चे शिकार

CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध

WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!

CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख

English summary :
Sushant Singh Rajput Suicide jdu leader maheshwar hazari told rhea chakraborty the contract killer

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput Suicide jdu maheshwar hazari say rhea chakraborty contract killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.