CoronaVirus News : कोरोनाबाबत सर्च करणं पडू शकतं महागात, मानसिक आरोग्य धोक्यात, व्हाल 'डूम स्क्रोलिंग'चे शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 02:58 PM2020-07-30T14:58:00+5:302020-07-30T14:58:24+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. याचं दरम्यान अनेक जण सातत्याने कोरोना संदर्भात विविध गोष्टींची माहिती घेत आहे.

CoronaVirus Marathi News what is doomscrolling covid19 era experts said about panso | CoronaVirus News : कोरोनाबाबत सर्च करणं पडू शकतं महागात, मानसिक आरोग्य धोक्यात, व्हाल 'डूम स्क्रोलिंग'चे शिकार

CoronaVirus News : कोरोनाबाबत सर्च करणं पडू शकतं महागात, मानसिक आरोग्य धोक्यात, व्हाल 'डूम स्क्रोलिंग'चे शिकार

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत असून रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. याच दरम्यान अनेक जण सातत्याने कोरोना संदर्भात विविध गोष्टींची माहिती घेत आहे. मात्र कोरोनाबाबत सर्च करणं महगात पडू शकतं. यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात आलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, कोरोनाबाबत गरजेपेक्षा अधिक माहिती मिळवत असलेले लोक हे मानसिक तणावाचे शिकार होत आहेत. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांनी याला डूम स्क्रोलिंग (Doomscrolling)  असं म्हटलं आहे. डूम स्क्रोलिंग अत्यंत वाईट परिणाम हा लोकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती समोर आली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आता डूम स्क्रोलिंगचा धोका निर्माण झाला आहे. 

डूम स्क्रोलिंग म्हणजे कोरोना महासाथीबाबत माहिती घेण्यासाठी इंटरनेट, न्यूज मीडिया, सोशल मीडिया मर्यादेपेक्षा, गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापर करणं. यामुळे मनात नकारात्मक विचार येतात, नकारात्मक बातम्यांवर जास्त लक्ष केंद्रीत केलं जातं आणि परिणामी मानसिक तणाव, डिप्रेशन अशा समस्या उद्भवतात. लॉकडाऊनमुळे सध्या लोक घरात बंद आहेत. त्यामुळे असं होत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील मानसोपचार तज्ज्ञ एरियान लेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील कोरोना संकटाची माहिती जगभरातील मीडिया पुरवत आहे. लोक या याबाबत भरपूर प्रमाणात माहिती मिळवत आहेत. यानंतर लोक अधिकच घाबरू लागले आहेच. त्यांना आपल्याला देखील संर्सर्ग होईल आणि आपला मृत्यू होईल याची भीती वाटू लागली आहे. त्यांच्या आरोग्यात थोडा जरी फरक जाणवला तरी ते कोरोनाची लक्षणं समजू लागतात.

कोरोना व्हायरसबाबत आपल्याला अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. कारण या दिवसात अनेक लोक हे नकळत डूम स्क्रोलिंगचे शिकार होत आहे. त्यांची नजर नेहमी नकारात्मक बातम्यांवर असते. यामुळे त्यांच्या भाषेवर, बोलण्यावर मानसिकदृष्ट्या परिणाम होतो आहे. तणाव, डिप्रेशनसारखी परिस्थिती उद्भवते आणि विचार करण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : ...अन् पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं स्टेअरिंग हातात

CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध

मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन

WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!

CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई

 

Web Title: CoronaVirus Marathi News what is doomscrolling covid19 era experts said about panso

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.