शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

तीन संघ समर्थक संस्था मोदी सरकारच्या मदतीला

By admin | Updated: May 25, 2014 04:11 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन संस्था पुढील आठवड्यात सत्ता सांभाळत असलेल्या मोदी सरकारला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात आणि या सरकारला नवी ताकद देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन संस्था पुढील आठवड्यात सत्ता सांभाळत असलेल्या मोदी सरकारला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात आणि या सरकारला नवी ताकद देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. केरळमधील भारतीय विचार केंद्रम, मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि दिल्लीतील इंडिया पॉलिसी फाऊंडेशन या तीन संघ समर्थक संस्था मोदी सरकारला मौल्यवान माहिती पुरवून इतर मदत करून बौद्धिक क्षेत्राचे नियंत्रण करणार आहे. १९७३ मध्ये स्थापन झालेल्या दीनदयाल संशोधन संस्थेने ग्रामीण भागात केलेल्या आपल्या कार्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले होते. दिवंगत प्रमोद महाजन यांनी १९८० च्या अखेरीस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या मानाने इंडिया पॉलिसी फाऊंडेशन ही तशी नवी परंतु सर्वांत जास्त सक्रिय असलेली संस्था आहे आणि दत्तात्रय होसबोले, मनमोहन वैद्य, सुरेश सोनी आणि बजरंजलाल गुप्ता यांच्यासारखे संघाचे वरिष्ठ नेते या संस्थेच्या बोर्ड आॅफ गव्हर्नर्सवर आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू कपिल कपूर आणि दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक राकेश सिन्हा हे इंडिया पॉलिसी फाऊंडेशनचे काम पाहतात. महत्त्वाच्या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करणे, उर्दू प्रेसची देखरेख, मोफत आरोग्याचा अधिकार यासारख्या मुद्यांवर संशोधन करण्याचे काम ही संस्था करीत असते. इंडिया पॉलिसी फाऊंडेशन सरकारपासून अंतर राखेल आणि संशोधन व मतेमतांतराला आकार देण्याचे काम करेल. फाऊंडेशनने वैचारिक चळवळीमधील संप्रदायवाद नष्ट करण्यासाठी सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे काम केले आहे. सरकारमध्ये परिवर्तन म्हणजे इंडिया पॉलिसी फाऊंडेशनसारख्या राष्टÑवादी थिंकटँकने सकारात्मक परिवर्तन आणि विवेचनात्मक धोरण निर्धारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे होय, असे सिन्हा म्हणाले. ज्या ऐतिहासिक परिवर्तनाची नितांत गरज होती, ते परिवर्तन देशात घडून आलेले आहे. खर्‍या भारताने सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये स्वत:ला अभिव्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी आहे, असे मत भारतीय विचार केंद्रमचे पी. परमेश्वरन यांनी व्यक्त केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)