शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘महिला आरक्षणास या क्षणापासून पाठिंबा पण...’, राहुल गांधी यांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 06:42 IST

Women's Reservation: महिला आरक्षण आता या क्षणापासून लागू करण्यास आमचा पाठिंबा आहे. तो कायदा, आधीचा हवा. पण भारतातील दक्षिण, ईशान्य आणि लहान राज्यांच्या भारतीय संघराज्यातील प्रतिनिधित्वाला धक्का लावण्याची परवानगी विरोधक सरकारला देणार नाहीत असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला दिला.

नवी दिल्ली - महिला आरक्षण आता या क्षणापासून लागू करण्यास आमचा पाठिंबा आहे. तो कायदा, आधीचा हवा. पण भारतातील दक्षिण, ईशान्य आणि लहान राज्यांच्या भारतीय संघराज्यातील प्रतिनिधित्वाला धक्का लावण्याची परवानगी विरोधक सरकारला देणार नाहीत असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला दिला. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनाही अशाच प्रश्नांचा सामना करावा लागला होता; परंतु त्यांनी त्यातील धोके ओळखले. मात्र, सध्याचे केंद्र सरकार सध्या जी कृती करत आहे तशा हालचाली आधीच्या पंतप्रधानांनी कधीही केल्या नाहीत.

चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी नर्मविनोदी शैलीत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्या आयुष्यात पत्नी हा मुद्दाच नाही. महिलावर्गाकडून प्रत्येकजण खूप काही शिकत असतो. राष्ट्रीय विचारसरणी घडविण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. लोकसभेतील आपण सर्वजण महिलांच्या कामगिरीमुळे प्रभावित आहोत. पंतप्रधान, मी आमचा पत्नी या विषयाशी काहीही संबंध नाही. आम्हाला तो अनुभव आम्हाला मिळाला नाही. पण, आम्ही आई, बहीण यांच्याकडून नक्कीच बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत.

राहुल गांधी यांनी घातले ‘१६’चे कोडेराहुल गांधी यांनी आपली आजी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसोबतचा एक प्रसंग सांगितला आणि लोकसभेत १६ एप्रिलचा उल्लेख करत सूचक विधान केले. ते म्हणाले की, पंतप्रधानांमध्ये कमी उत्साह होता. 

अचानक माझ्या लक्षात आले की, ती तारीख १६ एप्रिल आहे. अरे देवा, किती विचित्र! आकडा : १६. माझ्या कोड्याचे उत्तर १६ आहे. जर कोणाला हे समजले असेल, तर त्यांनी मला संदेश पाठवावा.’ मात्र नंतर काँग्रेस नेत्यांनी निदर्शनास आणून दिले की १६ला इंग्रजीत ‘सिस्क्टिन’ म्हणतात. त्याचा उच्चार 'एपस्टाइन' या नावाशी जुळतो.

मला २० वर्षांत जमले नाही ते प्रियांकांनी ५ मिनिटांत केलेराहुल गांधी म्हणाले की, माझी बहीण व खासदार प्रियांका गांधी यांनीही गुरुवारी पाच मिनिटांच्या कालावधीत उत्तम भाषण केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हसविणे मी माझ्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत करू शकलो नाही. ती गोष्ट प्रियांका यांनी साध्य करून दाखविली असे राहुल गांधी यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

राहुल गांधींनी माफी मागावी : राजनाथ सिंहसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, पंतप्रधानांसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. द्रमुकच्या नेत्या कनिमोळी म्हणाल्या की, विधेयकाच्या निषेधार्थ द्रमुकचे खासदार गुरुवारी लोकसभेत काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आले होते. हे आंदोलन म्हणजे काळा तिलक आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते. मात्र, काळा रंग हा देवी कालीमातेचा रंग आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे त्या म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi supports women's reservation with caveats, targets Modi.

Web Summary : Rahul Gandhi backs women's quota but warns against disadvantaging smaller states. He referenced Indira Gandhi, hinted at a riddle involving '16', and praised Priyanka for making Amit Shah laugh, while Rajnath Singh demanded Gandhi's apology.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीWomen Reservationमहिला आरक्षण