Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:04 IST2026-05-04T13:04:11+5:302026-05-04T13:04:56+5:30

डीआरआर स्कूलमधील मतमोजणी केंद्रावर जेव्हा निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉन्ग रूम उघडण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा कुलुपाची चावीच मिळाली नाही.

strongroom lock issue karnataka davangere south bypoll vote counting delay | Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप

Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप

कर्नाटकातील दावणगेरे दक्षिण विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच एक मोठा गोंधळ समोर आला आहे. डीआरआर स्कूलमधील मतमोजणी केंद्रावर जेव्हा निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉन्ग रूम उघडण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा कुलुपाची चावीच मिळाली नाही. चावी हरवली होती. अखेर अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव दरवाजाचं लॉक तोडून आत प्रवेश करावा लागला.

या संपूर्ण घटनेनंतर मतमोजणी केंद्रावर एकच खळबळ उडाली. स्ट्रॉन्ग रूम उघडण्याची प्रक्रिया अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली. यावेळी कुमार रमणीकांत (जनरल ऑब्झर्व्हर), जी.एम. गंगाधरस्वामी (जिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हाधिकारी), संतोष कुमार (निवडणूक निर्णय अधिकारी), गिट्टी माधव विठ्ठल राव (सीईओ) आणि एच.टी. शेखर (पोलीस अधीक्षक) उपस्थित होते.

कुलूप उघडलं नाही म्हणून अखेर तोडलं

स्ट्रॉन्ग रूम उघडण्यासाठी आणलेल्या चाव्या मॅच झाल्या नाहीत आणि अनेक प्रयत्नांनंतरही कुलूप उघडलं गेलं नाही, तेव्हा नाईलाजास्तव एकूण ४ स्ट्रॉन्ग रूमचं लॉक हातोडा आणि छिन्नीच्या साहाय्याने तोडण्यात आलं.

विशेष म्हणजे पोस्टल बॅलेटची मोजणी सकाळी ८ वाजता आणि ईव्हीएमची मोजणी ८:३० वाजता सुरू होणार होती, परंतु या गोंधळामुळे प्रक्रियेला उशीर झाला. चावी न मिळण्याच्या या हलगर्जीपणावर जिल्हाधिकारी जी.एम. गंगाधरस्वामी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सहायक अधिकाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. प्रशासनाची ही मोठी चूक आता दावणगेरे मतमोजणी प्रक्रियेदरम्यान चर्चेचा मुख्य विषय बनली आहे.

Web Title : चाबी खोई! कर्नाटक में हथौड़े से तोड़ा गया EVM स्ट्रांग रूम का ताला

Web Summary : कर्नाटक के दावणगेरे में मतगणना से पहले स्ट्रांग रूम की चाबी गुम हो गई। अधिकारियों को ताला तोड़ना पड़ा, जिससे देरी हुई और जिलाधिकारी ने अधिकारियों की आलोचना की।

Web Title : Key Lost! Karnataka EVM Strong Room Lock Broken with Hammer.

Web Summary : Chaos erupted in Karnataka's Davanagere as the strong room key went missing before vote counting. Officials resorted to breaking the lock to begin the process, causing delays and sparking criticism from the District Collector.