शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

राज्य ग्राहक आयोगाच्या खंडपीठाचे सोमवारी उद्घाटन

By admin | Updated: March 21, 2015 00:09 IST

नाशिक : ग्राहक न्यायालये लोकाभिमुख व गतिमान व्हावी यासाठी राज्य सरकारने नाशिकला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे़ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकांच्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्णयांविरुद्ध या खंडपीठाकडे अपील दाखल करण्याची तसेच २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार कक्षेतील दावे या ठिकाणी दाखल करता येणार आहेत़ राज्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ सी़ चव्हाण यांच्या हस्ते या परिक्रमा खंडपीठाचे सोमवारी (दि़२३) उद्घाटन होणार आहे़

नाशिक : ग्राहक न्यायालये लोकाभिमुख व गतिमान व्हावी यासाठी राज्य सरकारने नाशिकला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे़ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ग्राहकांच्या तक्रारींबाबत दिलेल्या निर्णयांविरुद्ध या खंडपीठाकडे अपील दाखल करण्याची तसेच २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार कक्षेतील दावे या ठिकाणी दाखल करता येणार आहेत़ राज्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ सी़ चव्हाण यांच्या हस्ते या परिक्रमा खंडपीठाचे सोमवारी (दि़२३) उद्घाटन होणार आहे़जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये सोमवारी (दि़२३) रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास हा उद्घाटन समारंभ होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे प्रमुख जिल्हा व न्यायाधीश आनंद कारंजकर असणार आहेत, तर या कार्यक्रमास विभागीय आयुक्त एकनाथ डवले, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम, राज्य आयोगाचे सदस्य शशिकांत कुलकर्णी, उषा बोरा, उषा ठाकरे, ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे उपस्थित राहणार आहेत़या उद्घाटनास उपस्थित राहण्याचे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड़ जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड़ नितीन ठाकरे, ॲड़ अविनाश भिडे, ॲड़ बाळासाहेब आडके,ॲड़ किरण चांदवडकर, ॲड़ सुरेश निफाडे, ॲड़ हेमंत गायकवाड, ॲड़ संजय गिते, ॲड़ दीपक ढिकले, ॲड़ जालिंदर ताडगे, ॲड़ माणिक बोडके, ॲड़ अपर्णा पाटील, ॲड़ मंगला शेजवळ, ॲड़ अतुल लोंढे, ॲड़ अजय निकम, ॲड़ विद्येश नाशिककर आदिंनी केले आहे़ (प्रतिनिधी)--इन्फो--महिन्यातून आठ दिवस कामकाजग्राहकांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिलेल्या निर्णयाविरुद्ध या खंडपीठात अपील दाखल करता येणार आहे़ २० लाखांपेक्षा अधिक रकमेचे मूळ अधिकार क्षेत्रातील दावे या ठिकाणी चालविले जाणार असून, या परिक्रमा खंडपीठाचे कामकाज महिन्यातून आठ दिवस नाशिकच्या खंडपीठात चालेल़ या खंडपीठापुढे नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्‘ातील तक्रारींचे कामकाज या खंडपीठात चालणार असून, ग्राहक व वकील यांचा मुंबईला जावे लागणार नसल्याने वेळेची व पैशांचीही बचत होणार आहे़