शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सपात फूट! अखिलेश यांनी 235 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

By admin | Updated: December 29, 2016 22:06 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच समाजवादी पार्टीत फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच समाजवादी पार्टीत फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लखनऊमध्ये सकाळी सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर अखिलेश यादव यांनी 235 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे हे सर्वच उमेदवार सायकल चिन्हाऐवजी दुस-या वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. विशेष म्हणजे हे 235 उमेदवार समाजवादी पार्टीच्या उमेदवारांच्या विरोधातच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव विरुद्ध मुलायम सिंग यादव असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहम्मद शाहिद यांच्या म्हणण्यानुसार पार्टीत कोणतेही मतभेद नाहीत आणि उमेदवारांची कोणतीही यादी जाहीर केली नाही. तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनी 235 उमेदवारांची यादी नेताजी(मुलायम सिंग यादव) यांना दिल्याची माहिती अखिलेश समर्थक सुनील साजन यांनी दिली आहे. समर्थकांची उमेदवारी कापल्यानेच अखिलेश यादव नाराज असून, त्यांनी मुलायम सिंग यादव यांना विचारणाही केली आहे. तसेच अखिलेशने समर्थकांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचाही सूचना दिल्या आहेत. अखिलेश यादव यांनी मंत्री आणि आमदारांशी चर्चा करून ही यादी प्रसिद्ध केली आहे. मुलायम सिंग, शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्या झालेल्या बैठकीदरम्यान शिवपाल आणि अखिलेशमध्ये बाचाबाची झाल्याचीही माहिती आता समोर येत आहे. त्यामुळेच अखिलेश यांनी उमेदवारांची स्वतंत्र यादी तयारी केली आहे. दरम्यान, मुलायम सिंग आमचे आदर्श आहेत मात्र जनतेला अखिलेश यादव यांची गरज आहे. त्यांच्याविरोधात षड्यंत्र रचलं जात आहे, असंही समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तसेच अखिलेश समर्थक बृजलाल सोनकर म्हणाले, आम्हाला आमच्या विभागात जाऊन काम करण्याचे आदेश देण्यात आले असून, उमेदवारीची गरज नाही. आम्हाला अखिलेश यादवांना जिंकवायचं आहे. यादीची कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे एकंदरीत समाजवादी पक्षात निवडणुकीआधी मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे.