शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

CoronaVirus News: कोरोना रुग्णांची संख्या का वाढली?; 'टास्क फोर्स'नं मोदी सरकारची मोठी चूक दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 6:03 PM

कोविड-१९ टास्क फोर्सनं पंतप्रधान मोदींना दिला अहवाल

नवी दिल्ली: लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वी मजुरांना त्यांची घरी जाण्याची परवानगी देण्यात आली असती, तर देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सध्या इतका वाढला नसता, असं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे हे तज्ज्ञ एम्स, जेएनयू, बीएचयूसारख्या अग्रगण्य संस्थांमधील असून त्यांचा समावेश कोविड-१९ टास्क फोर्समध्ये होतो.देशातील कोरोना बाधितांची संख्या पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे. मृतांचा आकडा ५ हजारांहून अधिक आहे. त्यावर कोविड-१९ टास्क फोर्सनं एक अहवाल दिला आहे. 'घरी परतणारे मजूर आता देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना विषाणू घेऊन जात आहेत. स्वगृही परतलेल्या मजुरांमुळे कोरोना ग्रामीण आणि निमशहरी भागांत पोहोचला आहे. त्यामुळे अतिशय कमी रुग्ण असलेल्या भागांतील रुग्णांची संख्या वाढ लागली आहे. आरोग्य व्यवस्था अतिशय कमकुवत असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे,' असं टास्क फोर्सनं अहवालात नमूद केलं आहे.कोविड-१९ टास्क फोर्समध्ये इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (आयपीएचए), इंडियन असोसिएशन ऑफ प्रीव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन (आयएपीएसएम) आणि इंडियन असोसिशन ऑफ इपिडेमिओलॉजिस्ट (आयएई) या संघटनांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांनी तयार केलेला देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरील अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात आला आहे.देशात २५ मार्च ते ३० या कालावधीत अतिशय कठोर लॉकडाऊन पाळण्यात आला. मात्र तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. २५ मार्चला देशातील कोरोना रुग्णांची संख्या ६०६ इतकी होती. तीच संख्या २४ मे रोजी १ लाख ३८ हजार ८४५ वर पोहोचली, असं टास्क फोर्सनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. धोरणकर्ते प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून राहिले. त्याची जबरदस्त किंमत आज देशाला मोजावी लागत आहे. यामुळे आरोग्य आणि मानवतेवरचं संकट आलं आहे, असंदेखील अहवालात म्हटलं आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला अन् नियमावली केली प्रसिद्धमोबाईल नंबर राहणार दहाच आकडी; 'ट्राय'च्या खुलाश्यामुळे चिंताच मिटलीनेपाळची पुन्हा आगळीक, नव्या नकाशात भारताचे तीन भाग दाखवले आपल्या हद्दीतपेट्रोलचे दर, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड अन् रेल्वेसह उद्यापासून सहा नियम बदलणार, जाणून घ्या...उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडतोय का?; अमित शहा म्हणतात...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी